जळगाव शहरातील 21 "बीएलओं'वर कारवाई ? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

पडताळणी कार्यक्रमात हलगर्जीपणा करणाऱ्या महापालिकेतील महापालिकेत कर्मचारी असलेल्या 21 "बीएलओ' अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस तहसीलदारांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे

जळगाव ः मतदार यादी पडताळणी कार्यक्रमात हलगर्जीपणा करणाऱ्या महापालिकेतील महापालिकेत कर्मचारी असलेल्या 21 "बीएलओ' अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस तहसीलदारांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. 

आर्वजून पहा :डबघाईतील "महानंदा' चार वर्षात चांगल्या स्थितीत : खडसे

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारीत घोषित केलेल्या छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदार पडताळणी कार्यक्रमाबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्व अधिकाऱ्यांना हायब्रीड बीएलओ ऍप बाबत दि. 11 डिसेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात आले होते. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही बीएलओ यांनी या विषयाची दखल घेतली नाही. ही बाब गंभीर असून निवडणूक आयोगाचा अवमान करणारी आहे. त्यामुळे कामात टाळाटाळ आणि कसूर केल्याबाबत 21 बीएलओंवर लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 चे कलम 32 नुसार गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये? अशा आशयाची नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र तरी देखिल या बीएलओंनी 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी काम केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी शिफारस करणारे पत्र तहसीलदारांनी मनपा आयुक्तांना दिले आहे. 

हेपण पहा : तो...आवाज सुपरसॉनिक सुखोईचा ! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news jalgaon jmc 21 blo Action by Tahsildar