जळगाव-मनमाड तिसऱ्या रेल्वे लाइनचे काम मार्चपर्यंत होणार पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

तिसऱ्या मार्गासाठी  जळगाव शहरातील भोईटेनगर परिसरातील नवीन बोगद्याच्या लांबी वाढविण्याच्या कामास सुरवात झाली आहे. 

जळगाव ः जळगाव ते मनमाड दरम्यान रेल्वेकडून तिसऱ्या मार्गाचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जळगाव ते शिरसोली दरम्यान काम सुरू असून, ते मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. तिसऱ्या मार्गासाठी  जळगाव शहरातील भोईटेनगर परिसरातील नवीन बोगद्याच्या लांबी वाढविण्याच्या कामास सुरवात झाली आहे. 

नवीन बजरंग बोगद्यासमोर समांतर तयार बोगदा तयार करण्यात आला आहे. तो बसविण्यासाठी रेल्वेच्या दोन महाबली क्रेनद्वारे आणण्यात आल्या होत्या. आज दिवसभर सुमारे पन्नास कर्मचाऱ्यांनी क्रेनद्वारे समांतर बोगदा तयार करण्याचे काम केले. यामुळे नवीन बोगद्याखालील वाहतूक आजपासून तीन दिवस बंद करण्यात आली आहे. जुन्या बजरंग बोगद्याखालून वाहतूक सुरू आहे. बोगदा बसविण्याचे काम पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. 

नक्की पहा : मुलाचा साखरपुडा करून घरीही नाही गेले तोच... 
 

11.5 किलोमीटर अंतर 
जळगाव ते पाचोरा दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी भूसंपादनही पूर्ण झाले आहे. त्यातील जळगाव ते शिरसोली पहिल्या टप्प्यातील तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम 11.5 किलोमीटर आहे. मार्चअखेर पूर्ण होणार आहे. एप्रिलपासून शिरसोली ते पाचोरा तिसऱ्या मार्गाचे काम सुरू होईल. 

हेपण पहा :  किन्नर भिडले एकमेकांसोबत...एकास जबर मारहाण
 

जळगाव ते शिरसोली दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम गतीने सुरू आहे. त्यासाठी आज नवीन बजरंग पुलाची रुंदी वाढविण्याचे काम करण्यात आले. मंगळवारपर्यंत हा पूल वाहतुकीस बंद असेल. शिरसोलीपर्यंत तिसरा मार्ग पूर्ण होईल. 
- रोहित थावरे, 
उपमुख्य अभियंता, रेल्वे बांधकाम विभाग 

आर्वजून पहा : जन्मदात्याच्या शाळेला मुलाची अनोखी भेट
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news jalgaon to manmad new third railwey trak by complit march anding

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: