निःस्वार्थी काम करणाऱ्या व्यक्ती, कुटुंबे निर्माण व्हावीत : कुलगुरू डॉ. चांदेकर

avinash seva purskar
avinash seva purskar

जळगावः एखाद्या व्यक्तीने ठरविले तर तो आयुष्यात किती मोठी कामे करू शकतो, याचे जिवंत 
उदाहरण म्हणून आपण डॉ. सोनवणे दांपत्य आणि भारती ठाकूर यांच्याकडे पाहू शकतो. समाजात अशा निःस्वार्थीपणे काम करणाऱ्या व्यक्ती आणि कुटुंब निर्माण होण्याची गरज आहे, असे मत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तथा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केले. 

केशवस्मृती सेवा संस्था समूह आणि जळगाव जनता सहकारी बॅंक यांच्यातर्फे सातवा "डॉ. आचार्य अविनाशी सेवा' पुरस्कार वितरण सोहळा रविवारी सायंकाळी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात झाला. यात संस्थांतर्गत गटातून मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील लेपा या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या "नर्मदालय' संस्थेस तर व्यक्तिगत स्तरावर पुण्यातील "डॉक्‍टर फॉर बेगर्स' असा लौकिक असलेले भिक्षेकऱ्यांचे डॉक्‍टर अभिजित सोनवणे यांना सपत्नीक या पुरस्काराने गौरविण्यात आले. अनुक्रमे एक लाख आणि 51 हजार रुपये रोख तसेच मानपत्र, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

यावेळी व्यासपीठावर पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. त्यांच्यासह केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, जळगाव जनता सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अनिल राव, उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील उपस्थित होते. सुरवातीला अनिल राव यांनी प्रास्ताविकातून या पुरस्काराची भूमिका मांडली. संगीता अट्रावलकर आणि संदीप लाड यांनी सूत्रसंचालन केले. रत्नाकर पाटील यांनी आभार मानले. सोहळ्याला समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

माणुसकीचा झरा ः पालकमंत्री पाटील 
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की डॉ. अविनाश आचार्य या नावाशी माझा बालपणापासून संबंध असून, जळगावचे नावही डॉ. आचार्य यांच्या नावाने ओळखले जाते. त्यांनी स्थापन केलेली केशवस्मृती ही संस्था नसून "तो एक माणुसकीचा झरा' आहे. डॉ. सोनवणे यांच्यासारखा भिक्षेकऱ्यांचा डॉक्‍टर पुरस्कारासाठी शोधून त्यांचा सन्मान करणे हा जळगावचाही गौरव आहे. भिकाऱ्यांसाठी ते माणसाच्या स्वरूपातील परमेश्‍वर आहेत. 

नक्की पहा ः  मुलाच्या मृतदेहाजवळ सहा तास ती आक्रोश बसली अन्‌ पोलिस राहिले हद्दीच्या वादात

 
सेवाकार्य ही नर्मदेची हाक ः भारती ठाकूर 
नर्मदेच्या परिक्रमेसाठी गेले असता घेतलेला अनुभव, आलेले आजारपण, परिसरातील वैद्यकीय सुविधा आणि शिक्षणाचा अभाव यातून या परिसरासाठी काम करण्यासाठी मिळालेली प्रेरणा ही जणू नर्मदेचीच हाक होती, असे भावपूर्ण उद्‌गार "नर्मदालय' संस्थेच्या संस्थापिका आणि संस्था स्तरावरील पुरस्कार विजेत्या भारती ठाकूर यांनी काढले. 

छोटेसे काम.. ते अविनाशी आहे : डॉ. सोनवणे 
माझे छोटेसेच काम असले तरी ते अविनाशी आहे. कारण समाजाने नाकारलेल्या व्यक्ती म्हणजे भिक्षेकरी. त्यांच्यासाठी काम करताना हे काम कधीही संपणारे नसल्याने कदाचित मला हा पुरस्कार देण्यात आला असावा, अशी भावना "डॉक्‍टर फॉर बेगर्स' अशी ओळख असलेल्या डॉ. अभिजित सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com