ललित कोल्हेंच्या दोन साथीदारांना अटक 

arrest
arrest

जळगावः येथील बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर गोरजाबाई जिमखाना आवारात गुरुवारी (16 जानेवारी) माजी महापौर ललित कोल्हेंसह त्यांच्या साथीदारांनी हल्ला चढविला. यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हल्ल्यावेळी हजर असलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह दहा जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले असून, भीतीमुळे वांरवार विचारपूस करूनही ठोस व ठामपणे बोलण्यास कोणीही धजावत नव्हते. त्यामुळे अटकेतील दोघांकडून इतर साथीदारांची नावे आणि इतर माहिती घेण्यात येत आहे. 

गोरजाबाई जिमखान्यात रात्री आठच्या सुमारास खुबचंद साहित्या लाकडी बाकावर बसलेले असताना माजी महापौर ललित कोल्हेंसह त्यांच्या पाच-सात साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. हल्ल्यात साहित्या गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात दाखल गुन्ह्यात शहर पोलिसांनी कालपर्यंत दहा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदविल्यानंतर आज निरीक्षक अरुण निकम यांच्या डीबी पथकातील ललित कोल्हे यांचे साथीदार व हल्ल्यात सहभागी राकेश चंदू अगारिया (वय 22, वाघनगर, जळगाव) व नीलेश नंदू पाटील (वय 24) या संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दाखल गुन्ह्यात इतर संशयितांची माहिती त्यांना विचारण्यात येत असून, हल्ल्यातील इतर संशयीतही पोलिसांच्या संपर्कात आले असून, उद्या (22 जानेवारी) सकाळी दोन ते तीन संशयीत स्वतःहून पोलिसांत हजर होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. 

साहित्या मुंबईत 
जखमी खुबचंद साहित्या यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली असून तोंडावर, छातीवर, पाठीवर गंभीर मार लागला आहे. सिटीस्कॅन केल्यानंतर अंतर्गत रक्तस्त्रावाच्या शक्‍यतेने त्यांना तातडीने मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

साक्षीदारांमध्ये भीती कायम 
रिव्हॉल्वरने धमकावणे, प्राणघातक हल्ला, खंडणी आदींसंदर्भातील कलमांन्वये दाखल गुन्ह्यात घटनास्थळी हजर दहा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्ष तपासाधिकारी अरुण निकम यांनी नोंदवून घेतल्या. घडलेल्या घटनेवेळी हजर आणि गावात राजकीय पदाधिकारी म्हणून मिरविणाऱ्या मोठ्या नावांपैकी असलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष नोंदविण्याची वेळ आल्यावर मी तेथे नव्हतो, मारहाण झाल्यावर आलो', अशा पद्धतीने माहिती लपविण्याचा प्रयत्नही काहींनी केला. राजकीय पदाधिकारी असलेल्या साक्षीदारांना "वैर' नको म्हणून भीती असल्याचे स्पष्ट जाणवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, यामध्ये सहभागी मुख्य संशयितासह त्याच्या साथीदारांचा पोलिस पथके शोध घेत असून, जवळपास गुन्ह्यातील सहा हल्लेखोरांची नावे आजपर्यंत निष्पन्न झालेली आहेत. नावे समोर आलेल्या प्रत्येकाला अटक करण्यात येणार असून, लवरच मुख्य संशयितालाही आमची टीम अटक करेल. 
 अरुण निकम, पोलिस निरीक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com