"ईद'च्या नमाजसाठी  मौलवींची एसपींना विनंती ;पोलिस अधीक्षकांसमवेत बैठक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

लॉकडाउनमुळे पंच्चावन्न दिवसांपासून शहरातील सर्वच धार्मिकस्थळे बंद ठेवण्यात आले आहेत. 25 मेस रमजान ईद येत असून किमान 20 मिनिटे नमाजसाठी परवानगी मिळावी अशी मागणी मुस्लिम बांधवातर्फे जिल्हा पोलिस अधीक्षकांना करण्यात आली.

जळगाव,: लॉकडाउनमुळे पंच्चावन्न दिवसांपासून शहरातील सर्वच धार्मिकस्थळे बंद ठेवण्यात आले आहेत. 25 मेस रमजान ईद येत असून किमान 20 मिनिटे नमाजसाठी परवानगी मिळावी अशी मागणी मुस्लिम बांधवातर्फे जिल्हा पोलिस अधीक्षकांना करण्यात आली. पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी साधेपणाने ईद साजरी करण्याबाबत मार्गदर्शन केले. 

जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या आवारात आज जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी शहरातील विविध मशिदीतील मौलवी आणि समाजबांधवांची बैठक बोलावली होती. रमजान ईद सोमवारी (ता. 25) असून यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासोबतच गर्दी न करण्याबाबत आवाहन केले. मैलवी यांनी रमजान ईदची नमाज इतर वेळेसच्या प्रार्थने पेक्षा वेगळी असून मशिदीत मोजक्‍याच लोकांना किमान वीस मिनिटे नमाजसाठी मुभा मिळावी अशी मागणी केली. पोलिस अधीक्षक डॉ. उगले यांनी याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्‍वस्त केले. मात्र, तो पर्यंत आहे तशीच परिस्थिती अबाधित राखण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, पोलिस निरीक्षक अकबर पटेल, अरुण निकम, विनायक लोकरे, अनिल बडगुजर आदींची उपस्थिती होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news ; Maulvi's request to SP for Eid prayers