यशने गाठला विक्रुतीचा कळस...मुलांसह कुत्र्याला ही त्याने सोडले नाही ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

एकामागून एक तीन खुन केल्यानंतर आणि खुनानंतर चिमुरड्यांच्या मृतदेहाच्या विटंबनेची माहिती कळाल्यावर ग्रामस्थांनी गांभीर्याने घेत त्याचे मनोविकृत कृत्य उघड केले.

जळगाव  : तीन अल्पवयीन मुलांवर अनैसंर्गीक कृत्य करुन त्यांचे खुन करणाऱ्या यश चंद्रकांत पाटिल (वय-22) या नराधमाचे एकुण-एक किस्से आता समोर येवु लागले आहे. तो टिक-टॉकवर नेहमीच सक्रीय होता. गावातील मोकाट कुत्र्यांसोबतही त्याने गैरकृत्ये केल्याचा संशय असून कुत्र्याला मारल्यानंतर त्याचे डोळे काढून घेत असल्याचे खात्रीलायक वृत्त गावातील लोकांनी दिले आहे. दुसरीकडे त्याच्या जाळ्यात अडकणाऱ्या प्रत्येकच मुलाचा खुन करतांना त्याचे डोळे फोडत होता, मृतदेहाची प्रचंड विडंबना करीत असल्याने पोलिसांचा तपास भटकवत होता. 

भडगाव येथील इशम बब्बु सैय्यद याच्यावर अनैसंर्गीक कृत्य केल्यानंतर त्याचे डोळे काढून खालच्या ओठा पासून कातडे सोलण्यात आले होते, भोकर येथील रोहित सैंदाणे या मुलाचा खुन केल्यानंतर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता, तर डांभुर्णीच्या कैलास कोळी या बालकाच्या मृतदेहाचीही त्याने विटंबना केल्याची माहिती येत आहे. निघृणपणे होणाऱ्या या खुनांच्या घटनेत नेहमीच अघोरी पद्धतीने मृत्यु झाल्याने पोलिसांचा तपास त्या दिशेने आणि नरबळीच्या शक्‍यतेतूनही केला जाई परीणामी त्याच्यावर आजवर कुणाचे लक्ष गेलेच नाही. चित्र विचीत्र टॅक-टॉकचे व्हिडीओ करून ते, तो व्हायरल करीत होता. त्याच्या फ्रेंड लिस्टमध्ये आणि त्याला लाईक करणाऱ्यांमध्ये सर्वाधीक नव्या वयातील मुल असून त्यांनाच त्याने आपल्या जाळ्यात ओढले. 

कुत्र्याचेही डोळे काढले.. 
यश चंद्रकांत पाटिल याने गावातील एका कुत्र्याला मारल्यानंतर त्याचेही डोळे फोडले होते. गावातील मोकाट कुत्रे नेहमीच यशच्या टार्गेट वर होती. ऐरवी गावातील पोरंही मोकाट कुत्र्यांना दगड मारतात म्हणून त्याच्यावर कुणाचे लक्ष गेले नाही, मात्र एकामागून एक तीन खुन केल्यानंतर आणि खुनानंतर चिमुरड्यांच्या मृतदेहाच्या विटंबनेची माहिती कळाल्यावर ग्रामस्थांनी गांभीर्याने घेत त्याचे मनोविकृत कृत्य उघड केले. 

पोलिस गाड्यांवर दगडफेक 
सिरीयल किलर यश चंद्रकांत पाटिल याला अटक करुन जळगावी आणत असतांना डांभुर्णी गावात आणि त्यानंतर विदगाव-ममुराबाद रस्त्यावर दोन वेळेस ग्रामस्थांनी वाहने थांबवुन आरोपीला आमच्या स्वधीन करावे यासाठी दबाव आगणला. पोलिसांची वाहने थांबवुन ग्रामस्थांनी ओरापीला ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज केल्याने संतप्त ग्रामस्थांनी पोलिस वाहनांवर तुफान दगडफेक करून संताप व्यक्त केला. 

संशयीताने दिली तीन खुनांची कबुली 
अटक करुन आणल्यानंतर यश चंद्रकांत पाटिल यांची सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांनी सलग पाच तास चौकशी केल्यावर त्याने डांभुर्णीतील कैलास चंद्रकात कोळी, भालोद येथील रोहित नवल सैंदाणे(वय-12) या दोघांच्या खुनाची कबुलीतर दिलीच सोबतच भडगाव येथे एक वर्षापुर्वी इशम बब्बु सैय्यद (वय-9) याचाही खुन असाच केल्याचे त्याने चौकशीत कबुल केले आहे. 

संशयीत "टिक-टॉक'चा खिलाडी 
संशयीत यश चंद्रकांत पाटिल या मनोविकृताला टिक-टॉकचे वेड होते. टिकटॉक या सोशल मिडीयाच्या माध्यमातुन तो चर्चेत होता. अगर किसो को, मैं पसंद नहि तो, कोई बात नहि..हर किसीकी पंसद अच्छी थोडी होती है..हा सर्वाधीक व्हायरल झालेला त्याचा व्हिडीओ सद्या चर्चेत आला आहे. टिकटॉक चे व्हिडीओ बनवण्याचे आमीष देत तो, या लहान मुलांशी मैत्री करुन त्यांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचे समोर आले असून, भालोद येथील रोहित सैंदाणे यालाही टिकटॉकच्या नावानेच त्याने आपल्या जाळ्यात ओढल्याचे त्याने पोलिसांसमक्ष कबुल केले. संशयीताचे टिकटॉकचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याने त्याच्या संपर्कात येणाऱ्या मुलांशी तो मैत्री करीत होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news three boy murder Serial killer arest by polise