‘मार्च एंडिंग’लाच जळगाव ३८ अंशांवर!

Temperature
Temperature

जळगाव - शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत थंडी जाणवत असताना गेल्या आठवडाभरापासून पारा हळूहळू वर चढू लागला. त्यामुळे किमान तापमान वाढण्यास सुरवात झाली. 

मार्चच्या सुरवातीला थंडी जाणवत असताना ‘मार्च एंडिंग’ला तापमान चाळीशीकडे वाटचाल करत आहे. आजचे जळगावचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असले, तरी रात्री आणि पहाटेच्या हवेत गारवा जाणवत आहे. 

गेल्या आठ दिवसांपासून तापमानात वाढ होऊन पारा ३५ अंशांवर गेला होता. त्यामुळे दुपारी उन्हाचे चटके जाणवू लागले होते. मध्यंतरी पुन्हा हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिक थंडीने कुडकुडत होते. 

मात्र, त्यानंतर तापमानात वाढ झाली आणि दुपारी उन्हाचे चटके जाणवू लागले. ही वाढ दिवसागणिक सुरूच असून, आज ममुराबाद येथील हवामान विभागात कमाल तापमान ३८.२, तर किमान तापमान १८.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. 

आठवडाभरापासून पारा स्थिर
जळगावचे तापमान ‘मार्च एंडिंग’लाच चाळीशीपर्यंत पोहोचेल, अशी स्थिती सध्या दिसत आहे. त्यामुळे अंगाची लाही-लाही करणारे तापमान आता बऱ्यापैरी वाढीस लागले आहे. साधारण दहा-बारा दिवसांपूर्वी कमाल तापमान ३५ सेल्सिअसपर्यंत होते. मात्र, मागील आठवड्यात तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून स्थिरावले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी तापमान दोन अंशांनी खाली आले होते. मात्र, आज पुन्हा तापमान ३८ अंशांवर पोहोचले असून, दोन-तीन दिवसांत पारा चाळीशीवर जाण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com