मूलभूत कामांसाठीचा निधी  दुसऱ्याच कामांवर केला खर्च 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

मूलभूत कामांसाठीचा निधी 
दुसऱ्याच कामांवर केला खर्च 

मूलभूत कामांसाठीचा निधी 
दुसऱ्याच कामांवर केला खर्च 

जळगाव ः महापालिकेला राज्य शासनाकडून चार वर्षांपासून चौदाव्या वित्त आयोगाचा निधी दिला जात आहे; परंतु ज्या मूलभूत कामांसाठी निधी दिला होता, तो निधी दुसऱ्याच विकासकामांसाठी अधिकाऱ्यांनी वापरला. त्यामुळे आगामी काळात लेखापरीक्षण झाल्यास या कारभारावर आक्षेप निघणार असल्याची विश्‍वसनीय माहिती समोर येत आहे. 
महापालिकेच्या शाळांचे कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक तसेच शहरात अनेक ठिकाणी सुरू असलेले विकासकामांचे मक्तेदारांचे बिल मिळत नसल्याने वाद व गोंधळ सुरू आहे. त्यात शिक्षकांना पन्नास टक्के रकमेची 
बिले सादर केली जात नसल्याने प्रश्‍न सुटलेला नाही. त्यात 2015 पासून चौदाव्या वित्त आयोगातून केलेल्या विकासकामांची बिले देता येत नसल्याचे समोर आले आहे. 

 
भोंगळ कारभार चव्हाट्यावर 
संबंधित निधीतून कामे मंजूर करणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार समोर आला आहे. लेखापरीक्षण झाल्यास महत्त्वाच्या पदांवर काम केलेले सर्वच अधिकारी अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे चौदाव्या वित्त आयोगातून करता न येणारे कामे पूर्ण झाली आहे. त्याचे बिल आता वरिष्ठ अधिकारी नियमात नसल्याने बिल देण्यास तयार नाही. या कामांचे पैसे महापालिका फंडातून देण्याचा ठराव महासभेत करावा लागणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marthi news mnpa