...आता ‘मिशन जळगाव महापालिका’! - गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

जळगाव - जामनेर पालिकेत जनतेने विश्‍वास टाकून आपल्याला एकतर्फी सत्ता दिली आहे. आता यापुढे आपण ‘मिशन जळगाव’ सुरू करणार आहोत. युती करण्याबाबत पक्षाचे आमदार सुरेश भोळे, कार्यकर्ते व शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार, असे मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

जामनेर पालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी युती न करता एकतर्फी भरघोस यश मिळविले आहे. त्यामुळे आगामी जळगाव महापालिका निवडणुकीतही भाजप स्वतंत्र लढणार काय? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

जामनेरचे मिळालेले यश पाहता पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही भाजपने युती न करता स्वतंत्र निवडणूक लढवावी, असे मत व्यक्त केले आहे. याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की जामनेरच्या जनतेने आपल्याला विकासावरच निवडून दिले आहे. त्याच विश्‍वासावर आपण महापालिका निवडणुकीतही जनतेसमोर जाणार आहोत.

आता यापुढे आपले ‘मिशन जळगाव’ असणार आहे. गेल्या काही वर्षात जळगावची अक्षरश: वाट लागली आहे. जळगावात खूप काही करण्यासारखे आहे. परंतु ते झालेले नाही. जळगावकरांनी आमच्याकडे सत्ता दिली तर आपण जळगावचा चेहरा मोहरा बदलून दाखविणार आहोत. हे आपण विश्‍वासाने सांगू शकतो. आपल्याला राजकारण करावयाचे नाही तर विकास करायचा आहे. जळगाव खूप मागे पडले आहे, ते आपण निश्‍चित पुढे नेऊन दाखवू.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा कल घेणार
जामनेर पालिकेत युती न करता यश मिळविले. जळगाव पालिकेतही भाजप स्वतंत्रच लढणार काय? याबाबत मंत्री महाजन म्हणाले, की पक्षाचे आमदार सुरेश भोळे तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांचा कल घेणार आहोत. तसेच शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याशीही आपण युतीबाबत चर्चा करणार आहोत. त्यानंतरच युती करायची की स्वतंत्र लढायचे याबाबत निर्णय घेणार आहोत.

Web Title: jalgaon municipal girish mahajan politics