दिवसभरात आठशे गाळेधारकांना सव्वाशे कोटींची बिले वाटप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

जळगाव - महापालिकेच्या मुदत संपलेल्या संकुलांमधील गाळेधारकांना थकीत भाडे व मालमत्ताकर बिलांच्या वाटपाच्या प्रक्रियेस शनिवारपासून सुरवात झाली आहे. महापालिकेच्या किरकोळ विभागाने आज नऊ व्यापारी संकुलांमधील सुमारे ८००  गाळेधारकांना १२५ कोटी रुपयांच्या अंदाजित भाडे व मालमत्ताकराच्या बिलांचे वाटप केले. दरम्यान, या बिलांमधून पाचपट आकारलेल्या रकमेवर गाळेधारक नाराज असल्याचे माहिती समोर येत आहे. 

जळगाव - महापालिकेच्या मुदत संपलेल्या संकुलांमधील गाळेधारकांना थकीत भाडे व मालमत्ताकर बिलांच्या वाटपाच्या प्रक्रियेस शनिवारपासून सुरवात झाली आहे. महापालिकेच्या किरकोळ विभागाने आज नऊ व्यापारी संकुलांमधील सुमारे ८००  गाळेधारकांना १२५ कोटी रुपयांच्या अंदाजित भाडे व मालमत्ताकराच्या बिलांचे वाटप केले. दरम्यान, या बिलांमधून पाचपट आकारलेल्या रकमेवर गाळेधारक नाराज असल्याचे माहिती समोर येत आहे. 

जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या किरकोळ वसुली विभागाच्या पथकाने सेंट्रल फुले व महात्मा फुले मार्केटमधील ९१० गाळेधारकांना बिले वाटप करण्याची प्रक्रिया शनिवारी सुरू केली. किरकोळ वसुली विभागाने आज नऊ व्यापारी संकुलांत सकाळी साडेदहापासून बिलवाटप करण्याच्या कामाला सुरवात केली. नऊ मार्केटमधील सुमारे ८०० गाळेधारकांना आज १२५ कोटीचे बिल अदा करण्यात आले असल्याची माहिती किरकोळ वसुली विभागाचे अधिकारी नरेंद्र चौधरी यांनी माहिती दिली. 

जुने बी. जे., श्‍यामाप्रसाद मार्केटपासून सुरवात
किरकोळ वसुली विभागाच्या पथकाने आज (ता.२२) सकाळी जुने बी. जे. मार्केटमधील (३३९), श्‍यामाप्रसाद मुखर्जी मार्केटमधील (३०) असे ६५० गाळेधारकांना बिले वाटप करण्यास सुरवात केली. दुपारनंतर भास्कर मार्केट (२८१), डॉ. आंबेडकर मार्केट (६९), वालेचा मार्केट २(१२), शास्त्री टॉवर खालील गाळे (६), रेल्वे स्टेशन चौक (१९), धर्मशाळा मार्केट(१६), भोईटे मार्केट (२४) यामधील गाळेधारकांची बिले तयार करणे सुरू केले होते. महापालिकेच्या किरकोळ विभागाचे अधिकारी नरेंद्र चौधरी, गौरव सपकाळे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी बिले वाटप केली होती.

पाचपट रक्कम आकारणीवर नाराजी
मुदत संपलेल्या गाळेधारकांना दिल्या जाणाऱ्या गाळेभाड्याच्या बिलात महापालिकेने २०१२ ते २०१५ पर्यंतच्या थकबाकीवर आकारलेली पाचपटनुसार रक्कम आकारली आहे. या आकारणीवर गाळेधारकांमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे.

सव्वाशे कोटी अंदाजित उत्पन्न 
जुने बी. जे. मार्केटमधील गाळेधारकांची भाड्याची बिले ३७ कोटी ६० लाखांची तर मालमत्ताकराची १६ कोटी ५१ लाखांची बिले आहेत. श्‍यामाप्रसाद मुखर्जी मार्केटमधील गाळेधारकांची ४ कोटी १० लाखांची तर १७ लाख ८९ हजार रुपयांची मालमत्ताकराची बिले आहेत. भास्कर मार्केटमधील गाळेधारकांना २६ कोटी १८ लाखांच्या भाड्याची तर ११ कोटी ४२ लाखांची मालमत्ताकराची बिले दिलीआहेत. तर उर्वरित सहा मार्केटमधील गाळ्यांचे सुमारे ३० ते ४० कोटींचे गाळेभाडे व मालमत्ताकराचे बिल महापालिकेतर्फे देण्यात आले आहे.

Web Title: jalgaon news 1.25 crore rupess bill distribution