जळगाव जिल्ह्यात १८ टॅंकरने पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

जळगाव - यंदा अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. आता पावसाळा संपत आला असल्याने चांगल्या पावसाची आशा मावळत चालली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील ३६ गावांमध्ये १८ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. उन्हाळ्यात ही समस्या अधिक जटिल होणार असून, तीव्र पाणी टंचाईची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सरासरी पावसाच्या ६४ टक्के पाऊस झालेला आहे. अमळनेर, जामनेर, भुसावळ, बोदवड, पारोळा, जळगाव या तालुक्‍यात अद्यापही अत्यल्प पाऊस असल्याने टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. सर्वाधिक टॅंकर अमळनेर तालुक्‍यात आहेत. जळगाव, भुसावळ, पारोळा येथे प्रत्येकी एक टॅंकर आहे.

गतवर्षी जुलै अखेर टॅंकर बंद करण्यात आले होते. मात्र यंदा पाणी टंचाई निवारण्यासाठी जिल्ह्यात ९४ गावातील ९३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अकरा गावांमध्ये नऊ ठिकाणी तात्पुरती पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. ७१ गावांमध्ये १४० नवीन विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत. २६ गावामधील ३८ ठिकाणी नवीन कूपनलिका घेण्यात आल्या आहेत. पाच गावात विहीर खोलीकरणाची कामे तर एका गावात नळ योजना दुरुस्तीची काम सुरू आहे.

पावसाने दिलेल्या ओढीमुळे खरिपाच्या उत्पादनात पंचवीस ते तीस टक्के घट येणार आहे. सध्या परतीचा पाऊस सुरू आहे. तो रब्बीच्या पिकांसाठी लाभदायक असला तरी पाऊस दमदार नाही.

या तालुक्‍यांना दिलासा 
धरणगाव, एरंडोल, यावल, रावेर, मुक्ताईनगर, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, चोपडा या तालुक्‍यातील एकाही गावात टॅंकर सुरू नाही. यामुळे या तालुक्‍यांना दिलासा मिळाला आहे.

टॅंकरची स्थिती
तालुका    गावे    टॅंकर

जळगाव    १    १
जामनेर    ७    ४
भुसावळ    १    १
बोदवड    २    १
अमळनेर    २३    १०
पारोळा    २    १
एकूण    ३६    १८

Web Title: jalgaon news 18 tanker for water supply