जळगावात पत्र्याचे छत कोसळून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

  • गळक्‍या छतावर पिता प्लॅस्टिक कागद टाकतांना घडली दुर्घटना 
  • वाळवी लागलेल पार्टेशन, पत्र्यावर ठेवलेले मोठ-मोठे दगड कारणीभूत 

जळगाव : तांबापूरा झोपडपट्‌टीत पार्टेशनच्या घरावरील पन्हाळीपत्रेगळत असल्याने प्लॉस्टीक ताडपत्री टाकतांना छत कोसळून झोळीतील दोन वर्षीय बालकाचा मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली. तांबापुरा अजमेरी गल्लीतील रहिवासी रऊफ पटेल रविवारचा दिवस आणि पावसाने उसंत घेतल्याने छतावर प्लॉटीक टाकत होते. अचानक संपुर्णछत कोसळून दुर्घटना घडल्याने गल्लीतील महिला पुरुषांनी मदतीसाठी धाव घेतली. जमखी पित्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

तांबापुरातील अजमेरी गल्लीत रऊफ हकीम पटेल(वय-30)पत्नी साजेदाबी, मुली हुमेरा(वय-5), रोजमीन(वय-3) आणि मुलगा असद यांच्यासह वास्तव्यास आहे. रद्दी-भंगार गोळा करुन कुटूंबाची गुजराण चालवत होते. पावसाळा सुरू झाल्याने गेल्या काही दिवसांपासून छत गळत होते. रात्री जोरात पाऊस आला तरी घरात झोपता येईना, म्हणुन छतावर टाकण्यासाठी प्लॉस्टीक ताडपत्री मिळवून ती रविवार उसंतीचा दिवस म्हणुन दुपारी एकवाजात रऊफ पटेल छतावर ताडपत्री टाकत होते.

एका बाजूने टाकून झाल्यावरत पुढे सरकवत असतांनाच छताच्या मधोमध असलेल्या आडव्या बल्लीवर वजन पडून काहीक्षणातच छत कोसळले. खाली त्याच बल्लीवर बांधलेल्या झोक्‍यात नुकताच असद झोपलेला होता. छतावरचे दगड पत्रे आणि खालून डोक्‍याला जोरदार फटाका बसल्याने त्याचा या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. छतपडल्याने रऊफ पटेल याच्याही अंगावर पत्रापडल्याने पायाचे बोट कापले गेले. तत्काळ दोघा बाप लेकांना जिल्हा रुग्णालय व तेथून रऊफ पटेल याला डॉ.भंगाळे यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, घटनेची माहिती मिळाल्यावर औद्योगीक वसाहत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी केली. जखमीच्या जबाबा नंतर या प्रकरणी अकस्मीक मृत्युची नोंद होवुन दुर्घटनेच्या कारणांचा तपास होणार आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: jalgaon news 2 years child killed roof collapsed