पिंप्राळ्यात २५२ घरकुले पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

जळगाव - दांडेकरनगर झोपडपट्टीधारकांसाठी एकात्मिक झोपडपट्टी निर्मूलन योजनेंतर्गत पिंप्राळा परिसरात ४७२ घरकुलांची योजना सुरू आहे. यातील १४४ घरकुले मुदत संपल्यानंतरदेखील काम सुरू न झाल्याने ती पंतप्रधान आवास योजनेत वर्ग करण्यात आली आहेत. पूर्ण झालेल्या पहिल्या टप्प्यातील २५२ घरकुले महिनाअखेर लाभार्थ्यांना दिली जाणार आहेत. मूळ योजना ११ कोटी ९७ लाख रुपयांची आहे.

पिंप्राळा- हुडको परिसरात सुरू असलेल्या या कामांची पाहणी अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी आज केली. महापालिकेने रेल्वेमार्गाजवळील दांडेकरनगर झोपडपट्टीधारकांसाठी शासनाच्या ‘आयएचएसडीपी’ योजनेंतर्गत पिंप्राळा शिवारातील गट नंबर २१४ येथे भाग १ वर घरकुल योजनेला १५ जानेवारी २०१३ ला कामास सुरवात झाली. योजनेंतर्गत ४७२ घरकुलांच्या कामांचा प्रस्ताव होता. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ३२८ पैकी २५२ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित ७६ घरांचे काम ऑगस्टअखेर पूर्ण होणार होते, ते अद्याप सुरूच आहे.

योजनेतील ४७२ पैकी ३२८ घरकुलांचे काम पूर्णत्वास आले असले, तरी १४४ घरकुलांच्या कामांना मुदत संपूनदेखील सुरवात न झाल्याने ती पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे महापालिकेकडून यासाठी वर्षभर मुदतवाढ मागण्यात आली होती. मात्र, मुदतवाढ न मिळाल्याने ही घरकुले आता पंतप्रधान आवास योजनेत वर्ग करण्यात आली आहेत. पंतप्रधान आवास योजनेत आतापर्यंत १२ हजार जणांची नोंदणी झाली असून, यासाठी प्रस्ताव तयार केला जाणार आहे.

Web Title: jalgaon news 252 gharkul complete in pimprala

टॅग्स