पिलखोडला कृषि विभागाकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

शिवनंदन बाविस्कर
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

गेल्या आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे कापुससह मका, बाजरी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे अद्याप कृषी विभागाकडून पंचनामे झाले नाहीत. त्या संदर्भात 'सकाळ'ने 14 ऑक्टोबरला 'नुकसानीच्या पंचनाम्यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.

पिलखोड (ता. चाळीसगाव) : गिरणा परिसरात झालेल्या सततच्या परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे व्हावेत व भरपाई मिळावी. यासंदर्भात 'सकाळ'ने बातमी प्रकाशित केली होती. त्याची कृषी विभागाने दखल घेत काल(ता. 15) शिवार पाहणी केली व लवकरच पंचनामे केले जातील असे कृषी सहाय्यकांनी 'सकाळ'ला सांगितले.

गेल्या आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे कापुससह मका, बाजरी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे अद्याप कृषी विभागाकडून पंचनामे झाले नाहीत. त्या संदर्भात 'सकाळ'ने 14 ऑक्टोबरला 'नुकसानीच्या पंचनाम्यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्याची कृषी विभागाने दखल घेत काल(ता. 15) येथील शेत शिवाराची पाहणी केली.

कृषी सहाय्यक संजय चव्हाण यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत कापूस पिकाची पाहणी केली. शिवाय शेतकऱ्यांना कापूस वेचणी करून उन्हात वाळवून घेण्यासंदर्भात आवश्यक ते मार्गदर्शन केले. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पंचनाम्याचे आदेश येताच तातडीने पंचनामे केले जातील असेही श्री. चव्हाण यांनी 'सकाळ'ला सांगितले. यावेळी पोलीसपाटील प्रशांत पाटील, पंकज बाविस्कर, निलेश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Jalgaon news agriculture department officer visits chalisgaon