हवाई दलाच्या भरतीत ३९७ उमेदवारांची शारीरिक चाचणी

जळगाव - हवाईदलाच्या भरतीप्रक्रियेत बुधवारी जिल्हा क्रीडा संकुलात मैदानी चाचणी घेण्यात आली. युवकांकडून शारीरिक व्यायाम करून घेताना अधिकारी.
जळगाव - हवाईदलाच्या भरतीप्रक्रियेत बुधवारी जिल्हा क्रीडा संकुलात मैदानी चाचणी घेण्यात आली. युवकांकडून शारीरिक व्यायाम करून घेताना अधिकारी.

जळगाव - जिल्ह्यात प्रथमच हवाईदलाची भरती प्रक्रिया कालपासून (७ नोव्हेंबर) सुरू झाली आहे. भारतीय हवाईदलातील ‘एअरमॅन ग्रुप वाय नॉनटेक्‍निकल ट्रेडस (ऑटोमोबाईल टेक्‍निशियन, जीटीआय व आयएएफ (पी)’ या पदाच्या भरतीसाठीची प्रक्रिया येथील मू. जे. महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशी जिल्हा क्रीडा संकुलात दिवसभर ३९७ उमेदवारांच्या विविध प्रकारच्या शारीरिक चाचण्या हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी घेण्यास सुरवात केली आहे. यात रनिंग स्पर्धेत २०३ उमेदवारांना बाद ठरविल्याने ते पुढील चाचणीसाठी अपात्र झाले. आता केवळ १९४ उमेदवारांची गटचर्चेसाठी निवड झाली आहे.

या भरतीस राज्यभरातील विविध ठिकाणचे युवक सहभागी झाले आहेत. आज क्रीडा संकुलात हवाई दलाच्या जवानांनी युवकांना शारीरिक चाचण्यांसाठी आणले. दिवसभर या चाचण्या सुरू होत्या.

अगोदर धावण्याची स्पर्धा झाली. नंतर उंच उडी, दोरीवरून उडी, पुलअप्स यासह विविध चाचण्या घेऊन युवकांची शारीरिक क्षमता तपासण्यात आली. धावण्याच्या स्पर्धेत ३९७ पैकी २०३ उमेदवार बाद ठरविण्यात आले. १९४ उमेदवारांची गटचर्चेसाठी निवड झाली. रात्रीउशिरापर्यंत चर्चा सुरू होती.

बादमुळे युवकांमध्ये निराशा
या भरतीसाठी सर्वांत महत्त्वाची पात्रता वयाची अट होती. शैक्षणिक पात्रता दहावी + २ ही परीक्षा ५० टक्के गुणांसह पास असणे आवश्‍यक होते. उमेदवार हा १३ जानेवारी १९९८ ते २७ जून २००१ दरम्यान जन्मलेला असावा. या मुख्य अटी होत्या. अनेक युवक वयाच्या अटीत बसत नसल्याने त्यांना परतावे लागल्याचे चित्र काल होते. आजही धावण्याच्या स्पर्धेत २०३ उमेदवार बाद ठरविले गेले. जन्म तारखेच्या अटीमुळे काल अनेक युवक भरतीतून बाद झाले होते. आज २०३ उमेदवार बाद झाले. त्यातूनही किती जणांची निवड होते हे निश्‍चित नाही. अशा प्रकारामुळे युवकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com