मद्यपी चालकाला पकडून देणाऱ्या दुचाकीस्वाराच्या धाडसाचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

जळगाव - सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रकचा मद्यपी चालक संतोष केकांत याने येथील आकाशवाणी चौकात मिनी ट्रकला धडक दिली. त्यानंतर न थांबताच त्याने भरधाव ट्रक नेत पसार होण्याचा प्रयत्न केला होता. अनेकांच्या जिवाशी खेळणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून दुचाकीस्वार अलाउद्दीन शेख यांनी तो अजिंठा चौकात अडवून सिलिंडर स्फोटाची धमकी देणाऱ्या चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यांच्या धाडसाचे कौतुक म्हणून उस्मानिया पार्क येथे त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. 

मनमाड येथून इण्डेन गॅस कंपनीचा सिलिंडर वाहतुकीचा ट्रक (एमएच ०४- बीयू ९३७९) घेऊन चालक केकांत शनिवारी सकाळी जळगावात आला. कालिंकामाता चौफुलीजवळ तो सिलिंडर उतरविणार होता. तत्पूर्वीच आकाशवाणी चौकातील सिग्नलवर त्याने सुसाट ट्रक मागे घेत मिनीट्रकला जोरदार धडक देत पळ काढला. तो भुसावळच्या दिशेने निघाला होता. उस्मानिया पार्क येथील रहिवासी शेख अल्लाऊद्दीन शेख खलील यांनी त्याचा पाठलाग करून ट्रक अडवला. अल्लाऊद्दीन यांच्या धाडसाचे कौतुक म्हणून आज उस्मानिया पार्क शिवाजीनगरातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, निवृत्त पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांतर्फे पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. यावेळी कादरिया फाऊंडेशनचे फारुख शेख, मौलवी वासीफ रजा, इमरान खान, गनी पिंजारी, मुश्‍ताक करिमी, सय्यद जावेद, नाजीम पेंटर, डॉ. नवीद, सिकंदर रिझवी, लुकमान तडवी, रोशन पिंजारी, सय्यद अर्शद अली आदींची उपस्थिती होती.

कंपनीला पत्रव्यवहार : निरीक्षक कुराडे
गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकांचा अजिंठा चौकातील धिंगाणा, त्यानंतर त्याने स्फोट घडवून आणण्याचा केलेला तमाशा पाहता त्याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून संबंधित कंपनीला याबाबत पोलिसांकडून लेखी सूचना आल्या आहेत. खबरदारीचे उपाय म्हणून अशा चालकांना जबाबदारी देऊ नये, असेही सूचित करण्यात आले आहे. 

Web Title: jalgaon news Alauddin Shaikh