हमीभावावरून अमळनेरला व्यापाऱ्यांनी लिलाव पाडला बंद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

संतप्त शेतकऱ्यांनी फोडल्या काचा; संचालकांच्या मध्यस्थीनंतर लिलाव सुरू 

अमळनेर : हमीभावावरून दोषी व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारणावरून आज सकाळपासून व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवला. आज सोमवारचा बाजार असल्याने आवक मोठ्या प्रमाणात होती. लिलाव होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव सुरू करण्याची मागणी केली.

बैठक सुरू असताना संतप्त शेतकऱ्यांनी सभापती दालनातील काचा फोडल्या. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. बाजार समितीचे संचालक उदय पाटील, प्रफुल्ल पाटील, महेश देशमुख, हरी भिका वाणी, संतोष बितराई, एन. के. पाटील आदी संचालकांच्या मध्यस्थीने अखेर दुपारी दोनच्या सुमारास व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू केला. मात्र, हा लिलाव व्यापारी आजच करणार असून, उद्यापासून (ता. 31) लिलाव बंद ठेवणार आहेत.

जोपर्यंत अधिकृत ग्रेडरकडून मालाची प्रतवारी करून मिळत नाही तोपर्यंत माल खरेदी केला जाणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. शासनाचा हमीभाव व व्यापाऱ्यांची खरेदी यात तफावत असल्याने शेतकरी नाहक भरडला जात आहे. दरम्यान बाजार समितीच्या आवारात रांगा लागल्या होत्या. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: jalgaon news amalner msp agri market auctions