तिहेरी तलाक विरोधात अमळनेरला मूकमोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

पाच हजार मुस्लिम महिलांच्या उपस्थितीने वेधले लक्ष

अमळनेर (जळगाव): तिहेरी तलाक विधेयक मागे घेण्यात यावे यासाठी आज दुपारी येथील मुस्लिम महिलांनी शहरातून मूकमोर्चा काढला. रणरणत्या उन्हात काढण्यात आलेल्या या मोर्चात सुमारे पाच हजार महिला व विद्यार्थिनी सहभागी झाल्या. प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

जाने चिस्थिया बहुउद्देशीय संस्था संचलित सुन्नी दारुल कझा यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. महिलासह शाळकरी विद्यार्थिनीही या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. निवेदनात म्हटले आहे, की लोकसभेत पारीत झालेला तिहेरी तलाक विधेयक भारतीय संविधानाचे उल्लंघन करणारे आहे. अल्पसंख्याकाच्या हितासाठी ही बाब धोकादायक आहे. भारतीय घटनेने प्रत्येकाला धर्मानुसार जगण्याचा अधिकार दिला असून यात सरकारने हस्तक्षेप करू नये असेही यात म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून मोर्चाला सुरवात झाली. दगडी दरवाजा, बाले मियॉं चौक, बस स्थानक, महाराणा प्रताप चौक मार्गाने प्रांताधिकारी कार्यालयात मोर्चा धडकला.

वाहतूक ठप्प
नियोजनबद्धरीत्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी मुस्लिम बांधव तरुणांकडून थंड पाण्याचे वाटप करण्यात आले होते. मोर्चामुळे बसस्थानक ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत महिलांची रीघ होती. यामुळे सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. मुस्लिम बांधवांनी व पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य केले. बंदोबस्तासाठी पोलिसांचा मोठा ताफा लावण्यात आला होता. रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली होती. रस्त्यावर पडलेल्या पाण्याच्या बाटल्यांचेही तत्काळ विल्हेवाट लावण्यात येत होती.

Web Title: jalgaon news amalner muslim women triple talaq