विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणप्रकरणी शिक्षक निलंबित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

गटविकास अधिकाऱ्यांचे पत्र; अमळनेरला महिला मंचच्या मोर्चाने वेधले लक्ष

अमळनेर (जळगाव) : जिल्हा परिषदेच्या कळमसरे (ता. अमळनेर) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणप्रकरणी शिक्षक जगदीश पाटील यास आज (सोमवार) निलंबित करण्यात आले.

प्रभारी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी मुख्याध्यापकांना आज पत्रही दिले आहे. मात्र, शिक्षकास लवकर बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज शहरातून महिला मंचतर्फे लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला.

कळमसरे येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक जगदीश पाटील हा विद्यार्थिनिंशी अश्‍लील चाळे करून त्यांचे लैंगिक शोषण करण्याचा प्रकार शुक्रवारी (ता. 23) उघडकीस आला होता. शनिवारी (ता. 24) जगदीश पाटील पोलिसांना शरण गेला होता. संतप्त ग्रामस्थ व पालकांनी शाळेला कुलूप ठोकून त्या शिक्षकास बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. मात्र, आज गटविकास अधिकाऱ्यांनी निलंबित केल्याबाबतचे अधिकृत पत्र शाळेतील मुख्याध्यापकांना दिले आहे. जगदीश पाटील यास रविवारी (ता. 25) न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मूकमोर्चाने वेधले लक्ष
या घटनेच्या निषेधार्थ आज महिला मंचतर्फे शहरातून लक्षवेधी मूकमोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना निवेदनही देण्यात आले. या मोर्चात डॉ. अपर्णा मुठे, तिलोत्तमा पाटील, जयश्री दाभाडे, योजना पाटील, शीला पाटील, माधुरी पाटील, सुलोचना वाघ, रंजना देशमुख, विजया जैन, भारती गाला, नयना कुळकर्णी, वसुंधरा लांडगे, उज्वला शिरोडे, सरोज भांडारकर, पुष्पलता पाटील, रिता बाविस्कर, ऍड. तिलोत्तमा पाटील, अंकिता पाटील आदींसह विविध शाळांतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Web Title: jalgaon news amalner Sexual harassment teacher suspended