आमचे शिक्षक आम्हाला परत द्या..!

योगेश महाजन
मंगळवार, 20 जून 2017

विद्यार्थ्यांचे आंदोलन; कळमसरे येथे शारदा माध्यमिक विद्यालय पाडले बंद 

अमळनेर : कळमसरे (ता. अमळनेर) येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील दोन शिक्षकांची संस्थांतर्गत नुकतीच बदली करण्यात आली आहे. ही बदली होऊ नये यासाठी आज सकाळी विद्यार्थ्यांनी व पालकांनी चक्क शाळाच बंद पाडली. आमचे शिक्षक आम्हाला परत द्या अशी हाकही विद्यार्थ्यांनी दिली आहे. बदली रद्द होत नाही, तोवर आंदोलन सुरूच ठेवू असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनास संस्थाचालक काय प्रतिसाद याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. 

संस्थेची कळमसरे येथे एक व किनोद (ता. जळगाव) येथे एक अशा दोन शाळा आहेत. या संस्थेअंतर्गत कळमसरे येथील एस. एफ. पावरा व के. जे. सोनवणे या शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. हे शिक्षक शिस्तप्रिय व विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक असल्याने त्यांची बदली करू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.

यासाठी त्यांनी आज शाळा बंद पाडून शाळेच्या आवारात आंदोलनही सुरू केले आहे. याबाबत शाळा प्रशासनाकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, तरीही ते एकण्याच्या मनस्थितीत नाहीत. सकाळ व दुपारचे दोन्ही सत्र विद्यार्थ्यांनी बंद पाडले आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
पालखी सोहळ्यात वारकरी विरुद्ध धारकरी : नक्की प्रकार काय?
मस्ती असेल तर 'मुदतपूर्व' घ्याच : उद्धव ठाकरे
#स्पर्धापरीक्षा - GST​
दिल्लीत महिलेवर गाडीत सामूहिक बलात्कार करून फेकून दिले​
कोहलीला खरंच नकोयं कुंबळे प्रशिक्षक​
मुंबईत भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या​
गरोदर लेकीला मारणाऱ्या नराधम बापाला अखेर फाशी

Web Title: jalgaon news amalner students lock school over teachers transfers