भाजपची ‘फोडा-झोडा’ नीती मारकच - चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

जळगाव - ‘फोडा-झोडा आणि भाजप वाढवा’ ही भाजपची रणनीतीच आहे. या पक्षाने पक्षांतर बंदी कायद्याला तिलांजली दिली असून, त्यांची ही नीती भारतीय लोकशाहीला मारक आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. 

तसेच शिवसेना हादेखील धादांत थापा मारणारा पक्ष आहे. ते लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढविण्याची भूमिका घेतील, असे वाटत नाही. आजपर्यंत शिवसेनेने केवळ भारतीय जनता पक्षाच्या सोयीचीच भूमिका घेतली असून, भाजपला विरोध हा शिवसेनेचा केवळ देखावाच आहे, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेचाही समाचार घेतला. 

गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर जिल्हा काँग्रेसचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार भाई जगताप आदी व्यासपीठावर उपस्थित होते. खासदार चव्हाण म्हणाले, की देशातील सरकार खोटारडे असून, त्यांनी मतदान यंत्रे ‘मॅनेज’ करून निवडणुका जिंकल्याचा आरोप होत आहे. मात्र, निवडणूक आयोग आणि सरकारही हा आरोप पुराव्यासह खोडून काढू शकलेले नाही. त्यामुळे आता जनतेच्या मनात मतदान यंत्रांबाबत संभ्रम कायम आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून जनतेची प्रत्येक बाबींत फसवणूक झाली आहे. त्यामुळे त्यांनी केलेली फसवणूक नागरिकांपर्यंत पोचविण्याची गरज आहे. 

Web Title: jalgaon news ashok chavan bjp congress