उष्णतेमध्ये तग धरणारे केळीचे वाण विकसित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

जळगाव - जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, जिल्ह्यात कडक उन्हाळा असल्याने या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. हे केळीचे नुकसान थांबविण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत शहरातील केळी संशोधन केंद्राने उष्णता वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये तग धरणारा बुटक्‍या प्रकारचे ‘बीआरएस २०१३-३’ (बनाना रिसर्च स्टेशन) केळीचे वाण विकसित केले आहे. याची उंची बसराई जातीच्या केळी वाणापेक्षा कमी आहे. या वाणाच्या धुळे, राहुरी व पुणे येथील संशोधन केंद्रावर चाचण्या सुरू असून पुढील वर्षी हे वाण प्रसारित होण्याची शक्‍यता केळी संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. नाझिमोद्दीन शेख यांनी वर्तविली आहे. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत शहरातील केळी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी गेल्या दहा वर्षांच्या संशोधनातून ‘बीआरएस २०१३-३’ हे वाण विकसित केले आहे. ‘बीआरएस’ हे वाण इतर केळीच्या वाणांच्या तुलनेत अधिक उत्पादनशील आहे. इतर संस्थांनी या वाणाचे अनुकरण करत त्यावर हक्क सांगू नये, यासाठी या वाणाची ‘डीएनए’ तपासणी आणि फिंगरप्रिंट ही प्रक्रिया केळी संशोधन केंद्राने सुरू केली आहे. राहुरी, पुणे आणि धुळे येथील कृषी संशोधन केंद्रांकडून चाचण्यांचे निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर हा वाण पुढील वर्षी प्रसारित होण्याची शक्‍यता आहे. 

४७ अंशांवरही धरणार तग
जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्यात अनेकदा ४७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाते. मार्च ते जून या काळात उष्ण वारे, तापमानामुळे केळीचे घड सटकणे, झाडे अर्ध्यातून मोडणे असे प्रकार होतात. काहीवेळा मे व जूनमध्ये येणाऱ्या वादळामध्ये केळी बागा जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान होत असते. या समस्या लक्षात घेऊन ‘बीआरएस- २०१३-३’ हे नवीन वाण विकसित केले आहे. 

प्रक्षेत्रावरील निष्कर्ष चांगले
शहरातील निमखेडी रस्त्यावरील कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर या वाणाच्या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांमधून चांगले निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. हे वाण अधिक तापमान व वाऱ्यात तग धरणारे असल्याचे सिद्ध झाल्याचे केळी संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. नाझिमोद्दीन शेख यांनी सांगितले. तसेच या वाणावर करपा रोग आल्यास तो सहन करण्याची देखील यात क्षमता यात आहे.

‘बीआरएस २०१३-३’ हे केळीचे वाण अधिक उष्णतेत तग धरते. उत्पादनही दर्जेदार व निर्यातक्षम आहे. या वाणाची लागवड अधिक तापमान असणाऱ्या विभागात शक्‍य असल्याचे निष्कर्ष मिळाले आहेत.
- प्रा. नाझिमोद्दीन शेख, प्रमुख, केळी संशोधन केंद्र

वैशिष्ट्ये
ग्रॅण्डनेन वाणांमधून निवड पद्धतीने विकसित
बुटक्‍या प्रकारचा वाण, झाडाची उंची कमाल १५८ सेंटिमीटर, घडाचे वजन सरासरी २२ किलो
साडेसात महिन्यांत निसवतो. केळीचा घेर १२ सेंटिमीटर, एका केळीची लांबी २१.५ सेंटिमीटर 
‘करपा’स सहनशील, उष्ण व वेगवान वाऱ्यात तग धरतो
वाऱ्यात पडझडीचे प्रमाण एक हजार झाडांमागे सात ते आठ झाडे
एका घडाला दहा फण्या ठेवल्या जातात. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने यास मान्यता

Web Title: jalgaon news banana new develop