दिवाळीच्या सुट्यांमुळे बसस्थानकात गर्दी 

दिवाळीच्या सुट्यांमुळे बसस्थानकात गर्दी 

दिवाळीच्या सुट्यांमुळे बसस्थानकात गर्दी 


जळगाव : दीपावली पर्वात भाऊ बहिणीच्या प्रेमाचा महत्त्वाचा दिवस असलेल्या भाऊबीजेसाठी माहेरी जाणाऱ्या अन बहिणीला भेटण्यास जाणारा भावांची आज बसस्थानकात गर्दी होती. रक्षाबंधनाप्रमाणे भाऊबीजेला विशेष महत्त्व आहे. या अनुषंगाने येथील बस आगारात माहेरी जाण्यासाठी महिलांची गर्दी होती. एसटी विभागाकडून दीपावली सणानिमित्त जादा बसेसचे नियोजन करण्यात आले. त्याचबरोबर सिजनचा लाभ घेत काही प्रवासी मार्गाच्या भाड्यात तात्पुरती वाढही केली. 
भाऊबीजनिमित्त जळगाव बसस्थानकात सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी होती. जळगाव ते पुणे दोन बस 23 पासून तर 25 पासून रात्रीच्या चार बस सोडण्यात आल्या आहेत. नाशिकसाठी पाच गाड्या व पुणेसाठी दोन जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच पंढरपूरसाठी विठाई या दोन नवीन गाड्या प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करण्यात आल्या असून, लांब पल्ल्यांसाठी शिवशाहीच्या दोन गाड्या असून, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी प्रशासनातर्फे जास्तीच्या गाड्यांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आगारप्रमुखांनी दिली. 

भाडेवाढीचा प्रवाशांना फटका 
दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर एसटी प्रशासनातर्फे 25 ऑक्‍टोबरपासून तर 4 नोव्हेंबरपर्यंत दहा टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. 

बसस्थानकात खड्डे 
जळगाव बसस्थानकात बस फलाटावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्याने हे खड्डे भरले जाऊन बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवाशांना साचलेल्या खड्ड्यांमधून बसपर्यंत जावे लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

विनाफलकाच्या बसमुळे तारांबळ 
दिवाळीच्या सुट्यांमुळे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असून, यात काही बस विनाफलकाच्या लावण्यात येत असल्याने नेमकी बस कुठे निघाली याचा अंदाज प्रवाशांना येत नसल्याने ऐनवेळी तारांबळ उडते. 

प्रवाशांची गैरसोय 
बसस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या बाकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. जिल्ह्याचे ठिकाण असून, बसस्थानकात दिवसभर प्रवाशांची वर्दळ असल्याने या ठिकाणी पुरेशा बाकांची व्यवस्था करण्याची गरज आहे. 

गुरुवारपासून आरक्षणात वाढ 
दिवाळीनिमित्त सुट्यांचे नियोजन करून प्रवाशांनी आता परतीच्या प्रवासाचे नियोजनही सुरू केले आहे. गुरुवारपासून (ता.31) एसटीच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या तिकीट आरक्षणांमध्ये वाढ होण्याचा अंदाज आगारप्रमुखांनी व्यक्त केला. 

कोट.. 
दिवाळीच्या सुट्या लक्षात घेता प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली असून, आगारात नवीन गाड्या दाखल झाल्या आहेत. बसस्थानकातील खड्ड्यांसाठी लवकरच 50 लाखांचा निधी उपलब्ध होणार असून, कामास सुरवात केली जाणार आहे. 
- प्रज्ञेश बोरसे, आगारप्रमुख, जळगाव बसस्थानक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com