भडगावातील लाडकुबाई माध्यमिक विद्यालयात अनोखी निवडणूक

सुधाकर पाटील
बुधवार, 19 जुलै 2017

विद्यार्थीना निवडणूक प्रक्रिया समजावी, लोकशाही रूजावी म्हणुन ही निवडणूक घेण्यात आली. ही सर्व निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांनीच हाताळली. निवडणुक शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यामधील सुप्त गुण यानिमित्ताने समोर आले.
- वैशाली पाटील मुख्याध्यापिका,  लाडकुबाई विद्यालय, भडगाव

भडगाव (जळगाव) : शासनाने विद्यापीठ प्रतिनीधी निवडण्यासाठी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र भडगावातील लाडकुबाई विद्यालयाने विद्यार्थ्यांमधे नेतृत्व गुण व लोकशाही प्रणालीची ओळख व्हावी म्हणून पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यामधुन प्रत्येकी एक विद्यार्थी व विद्यार्थीनीची मतदान प्रक्रियेव्दारे शाळा प्रतिनीधी म्हणुन निवड केली. या शाळेची निवडणूक तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. अश्या पध्दतीने निवडणूक घेणारी लाडकुबाई विद्यालय प्रथम ठरले आहे.

दहाविपर्यतच्या विद्यार्थ्याना मतदानाचा हक्क मिळत नाही. त्यामुळे ते निवडणूकीपासुन लांब राहतात. मात्र निवडणूकीबद्दल कुतुहलही तेवढेच असते. विद्यार्थ्यांना लोकशाही पध्दतीने निवडणूकीची ओळख व्हावी, विद्यार्थ्यांमधे नेतृत्व गुण विकसित व्हावेत म्हणून भडगावातील की कीसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई माध्यमिक विद्यालयाने  विद्यार्थी व विद्यार्थीनी मधुन प्रत्येकी एकाची शाळा प्रतिनीधी म्हणुन निवड करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 12 जुलैपासून ते 18 जुलै पर्यंत निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला. विशेष म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दहाविच्या विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आली होती.

प्रचार...भाषण अन मतदान
12 तारखेला मतदानासाठी विद्यार्थी व विद्यार्थीनीनी नामनिर्देशन दाखल केले. त्याच्या दुसर्या दिवसी माघारीची मुदत होती. त्यानंतर प्रचाराला सुरवात झाली. मतदानाच्या शेवटच्या दोन दिवस शेवटच्या तासाला सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून   उमेदवारांनी आपला अजेंडा विद्यार्थासमोर मांडला.  त्यांनी आपली भुमिका मांडत मतदार असलेल्या विद्यार्थ्यांना मतदानासाठी साद घातली. एखाद्या मुरलेल्या पहीलवानासारखी त्यांनी प्रचार यंत्रणा राबविली. चार दिवस अक्षरशः निवडणूकीचा धुराळा उडाला . या निवडणूकीने विद्यार्थी न्हाऊन निघाले. त्यांच्यातील नेतृत्वगुण, वक्तृत्व सर्वांसमोर आले. त्यांनी भाषणातुन मांडलेली भुमिका वखाण्याजोगी होती.

उमेदवारीला निकष
उमेदवारी करतांना काही निकष ठरविण्यात आले होते. जो विद्यार्थी नियमीत शाळेत येता. त्याची कमीत कमी 80 टक्के हजेरी आहे. नियमीत गणवेशात येतात आदी निकषात बसलेल्यानाच उमेदवारी करता आली. तर निवडणुकीची आचारसंहिताही ठरविण्यात आली होती. दहाविच्या विद्यार्थ्याना निवडणूक लढविण्यास बंदि होती. त्यांचे वैगुण्य नुकसान होऊ नये हा त्यामागील उद्देश होता. फक्त नववीचे विद्यार्थ्यानी उमेदवारी केली. एका विद्यार्थ्याला दोन मतदान देण्याचे अधिकार होते.

...आणि ते निवडणूक जिंकले
शाळा प्रतिनीधी निवडणुकीसाठी विद्यार्थामधुन सात तर विद्यार्थीमधुन सहा जणांनी जणांनी उमेदवारी केली. 17 तारखेला यासाठी शाळेत मतदान घेण्यात आले. प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्याना क्रमाक्रमाने बोलावुन शांततेत मतप्रक्रीयेव्दारे मतदान घेण्यात आले. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र चिन्ह देखील देण्यात आले होते.   पाचवी ते दहावीपर्यतच्या 820 विद्यार्थ्यानी मतदानाचा हक्क बजावला. काल ( ता. 18) ला सध्याकाळी मतमोजणी करण्यात आली. त्यात विद्यार्थी प्रतिनीधी म्हणुन संकेत हितेंद्र देवरे तर विद्यार्थीनी मधुन दक्षता विठ्ठल पाटील विजयी झाले. हितेंद्र देवरेला 380 मते मिळाली तो 131 मतांनी विजयी झाला. दक्षता पाटील ला 238 मते मिळाले तीने 51 मतांनी बाजी मारली. निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यानी एकच जल्लोष करत आनंद साजरा केला. विजयी उमेदवाराचा मुख्याध्यापीका वैशाली पाटील यांनी सत्कार केला. यावेळी उपमुख्यध्यापक आर.एस. पाटील शिक्षक उपस्थितीत होते. निवडणुक प्रक्रीयेचे कामकाज दिपक भोसले व व्ही.एस. पाटील यांनी पाहीले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: jalgaon news bhadgaon ladkubai vidyalay and election