जळगाव परिसरात आढळल्या पक्ष्यांच्या ९९ प्रजाती!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

जळगाव - बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्रॅमतर्फे (बी. एन. एच. एस) सात दिवसांची हिवाळी पक्षिगणना जळगाव परिसरात करण्यात आली. यात गायबगळे, मैना, कावळे, बुलबुल यांची मोठ्या प्रमाणात नोंद झाली. तर पारवे, चिमण्या, वेडा राघू हे पक्षी अल्प संख्येने आढळले.

जळगाव - बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्रॅमतर्फे (बी. एन. एच. एस) सात दिवसांची हिवाळी पक्षिगणना जळगाव परिसरात करण्यात आली. यात गायबगळे, मैना, कावळे, बुलबुल यांची मोठ्या प्रमाणात नोंद झाली. तर पारवे, चिमण्या, वेडा राघू हे पक्षी अल्प संख्येने आढळले.

बी. एन. एच. एस.चे जिल्हा समन्वयक राजेंद्र गाडगीळ यांच्या पक्षीमित्रांनी १४ ते २१ जानेवारी दरम्यान शहरातील दहा ठिकाणांवरील पक्षीगणना केली. या गणनेत ९९ प्रजातींच्या ७ हजार २८७ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. यात सर्वांत मोठी नोंद ही पूर्व युरोपमधून येणाऱ्या रोझी स्टार्लिंगची असून पूर्वी हजारोंच्या संख्येने असलेली संख्या यंदा ९९८ इतकी भरली आहे. जंगलाचा व शेतीचा ऱ्हास, वाढते शहरीकरण, जल, वायू व ध्वनी प्रदूषण, तसेच नियोजनशून्य पर्यटन यामुळे पक्ष्यांवर परिणाम होत असल्याचे पक्षीगनणेत होत असल्याचे आढळून आली आहे. पक्षीगनेत शिल्पा गाडगीळ, तेजस पंधारे, अभय पेंढारकर, विराज सोनवणे, रितेश गोसावी यांनी सहभाग घेतला.   

शेतजमीन नष्ट पक्ष्यांच्या मुळावर
दिवसेंदिवस जळगाव शहरासह विविध परिसरात बांधकाम क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे शेतजमिनी नष्ट होत आहे. त्यामुळे जंगल, शेती, झांडाची संख्या कमी होत असल्याने वृक्ष निवासी पक्ष्यांची प्रजाती व परदेशातून स्थलांतर करणारे पक्ष्यांच्या संख्येत घट झपाट्याने होत आहे. यात घुबड, मोर, घार, शिक्रा, कापशी, चिमण्या, धनेश पक्षी दुर्मिळ झाले आहे. तर मन्यारखेडा रोडवर दिसणारा साधा खारूची दोन वर्षापासून नोंद झालेली नाही.

मेहरूण, मन्यारखेडा, शिरसोली पाणवठ्यावर अल्प नोंद
मेहरूण तलावाची अंर्तगत व बाह्य भौगोलिक रचना पक्ष्यांच्या अधिवासाच्या दृष्टीने चांगली असल्याने पूर्वी या तलावावर देश- विदेशातून स्थलांतर केलेले हिवाळी पक्ष्यांची संख्या मोठी होती. परंतु तलावाच्या ठिकाणी वाढते बांधकाम, तलावाचे प्रदूषणामुळे पाहुणे पक्ष्यांची नोंद झालेली नाही. शिरसोलीच्या प्रदूषित तलावात दोन चक्रवाक बदके आढळली. तीच स्थिती मन्यारखेडा तलावात असून शेकडोंनी आढळणारे वारकरी पक्षी फक्त ५१ आढळले.

Web Title: jalgaon news bird 99 species in jalgaon area