पक्ष सोडायचा नाही, पण... : एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

रावेर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या आमंत्रणाला उत्तर

जळगाव: भाजपमध्ये राहून गेल्या चाळीस वर्षांपासून संघर्ष करत पक्ष उभा केला आहे. मात्र, माझ्यावरील कोणताही आरोप सिद्ध होत नसतांना माझ्यावर अन्याय होत आहे. पक्ष सोडायचा नाही; मात्र पक्षच बाहेर ढकलत आहे, आणि तशी परिस्थिती देखील पक्ष निर्माण करत असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज (गुरुवार) रावेर येथे आयोजित कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काँग्रेसमध्ये येण्याच्या आमंत्रणाला उत्तर देताना म्हणाले.

रावेर येथे आज काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील यांचा एकसष्टी गौरव सोहळा कार्यक्रम झाला. जळगाव जिल्ह्यातील रावेरला झालेल्या कार्यक्रमात एकनाथराव खडसे व अशोक चव्हाण हे एकाच व्यासपीठावर होते. मेळाव्यास उपस्थित माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खडसेंना उद्देशून म्हणाले, की पक्ष ढकलण्याची वाट पाहू नका, निर्णय घ्या. मित्र म्हणून मी मदत करेल आमच्या पक्षात तुमचे स्वागत आहे; असे खुले आमंत्रण त्यांनी खडसेंना दिले. तसेच आजच्या राजकारण्यामध्ये खडसेच खरे स्वाभिमानी आहेत असे वक्तव्य ही चव्हाण यांनी केले. यावर उत्तर देताना खडसे यांनी भाजप पक्ष सोडायचा नाही, पण तशी परिस्थिती पक्षात निर्माण केली जात असल्याचे ते म्हणाले.

Web Title: jalgaon news bjp eknath khadse congress ashok chavan and politics