...अन्‌ बसमधील 49 प्रवाशांचे प्राण वाचले! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातंर्गत येणाऱ्या चोपडा आगाराची बस (एमएच 20, बीएल 2488) पावागडकडून परत येत असताना आज सकाळी शहादा- प्रकाशाजवळ बसच्या मागील डाव्या बाजूच्या चाकाचे नट बोल्ट चालत्या गाडीतून निघण्याच्या स्थितीत आले होते. अगदी नटाचे बोल्ट हे एक- दोन आट्यांवर राहिले होते.

जळगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या महामंडळाच्या बसच्या मागील चाकाचे नटबोल्ट ढिले झाले असताना चालत्या बसचे चाक निघण्याच्या स्थितीत होते. परंतू, मागून येणाऱ्या मोटारसायकल चालकाच्या सदर प्रकार लक्षात आल्याने बसला ओव्हरटेकर करत बसचालकाच्या सदर बाब लक्षात आणून देत बसमधील 49 प्रवाशांचे प्राण वाचले. 

राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातंर्गत येणाऱ्या चोपडा आगाराची बस (एमएच 20, बीएल 2488) पावागडकडून परत येत असताना आज सकाळी शहादा- प्रकाशाजवळ बसच्या मागील डाव्या बाजूच्या चाकाचे नट बोल्ट चालत्या गाडीतून निघण्याच्या स्थितीत आले होते. अगदी नटाचे बोल्ट हे एक- दोन आट्यांवर राहिले होते. याकडे मागून दुचाकी वाहनधारकाचे लक्ष गेले असता; त्याने प्रसंगावधान राखत बसला ओव्हरटेक करत बस चालकाच्या सदर प्रकार लक्षात आणून देईपर्यंत चाकाचे नट बोल्ट निघून गेले होते.

दुचाकीचालकाने ही बाब बस चालकाला लक्षात आणून देत असताना बसचा वेग कमी झाला होता. परंतू, हा प्रकार लक्षात आली नसती आणि भरधाव वेगाने धावणाऱ्या बसच्या चाकातून नटबोल्ट निघाले असते, तर कदाचित मोठा अपघात झाला असता. मात्र दुचाकी चालकाच्या प्रसंगावधानाने अपघात टळला आणि बसमधील 49 प्रवाशी सुखरूप राहिले

Web Title: jalgaon news bus in jalgaon