चाळीसगाव : गिरणा धरणाचा साठा 57 टक्क्यांवर; आवक सुरू

शिवनंदन बाविस्कर
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

धरणात एकूण 13 हजार 595 दशलक्ष घनफुट साठा असून 10 हजार 595 दशलक्ष घनफुट जिवंत साठा शिल्लक आहे.

पिलखोड (ता. चाळीसगाव) : गिरणा धरणात सुरू असलेल्या आवकमुळे धरणाचा साठा 57 टक्क्यांवर गेला असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. 

गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे चांगली आवक सुरू आहे. सकाळी नऊला चणकापूर धरणातून 3 हजार 413 क्युसेक, पुनद धरणातून 3 हजार 60 क्युसेक, केळझर धरणातून 1 हजार 364 क्युसेक असे एकत्रित मिळून ठेंगोडा बंधाऱ्यातून 6 हजार 968 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर हरणबारी धरणातून 1 हजार 643 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

धरणात एकूण 13 हजार 595 दशलक्ष घनफुट साठा असून 10 हजार 595 दशलक्ष घनफुट जिवंत साठा शिल्लक आहे. यामुळे धरण 57. 27 टक्के भरले आहे. दरम्यान सध्या सुरू असलेली आवक बघता सायंकाळपर्यंत पाणीसाठ्यात दीड टक्क्यांनी वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
व्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले 
नदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा 
केशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार
रस्ते कामाबाबत चीनचे "गोलमाल'
कांद्याच्या भावाला लगाम बसणार
पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 
प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले
मुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी 
'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन 

Web Title: jalgaon news chalisgaon girna river dam water level