स्वच्छतेसाठी गोलाणी संकुल झाले पूर्णपणे बंद! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

तोडगा काढण्याबाबत चर्चा सुरू 
स्वच्छतेसाठी 19 जुलैपर्यंत संकुल पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याने आजपासून याची अंमबजावणी सुरू झाली आहे. परंतु, चार दिवस दुकाने बंद ठेवणे शक्‍य नसून यावर तोडगा काढण्यासाठी व्यापारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्यासोबत चर्चेसाठी गेले आहेत. यापुर्वी व्यापाऱ्यांच्या सकाळी झालेल्या बैठकीत स्वच्छता करण्यासाठी स्वतः खर्च करण्यासाठी तयारी दर्शविली आहे. 

जळगाव : 'स्वच्छ भारत- सुंदर भार' असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे लावत असून स्वच्छता मोहिम राबविली जाते. परंतू, दुसरीकडे अस्वच्छतेमुळे जळगाव शहरातील एक हजाराहून अधिक गाळे असलेले गोलाणी व्यापारी संकुल पूर्णपणे बंद करण्याची वेळ आली आहे. गोलाणी संकुलात असलेल्या अस्वच्छतेवरून महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली असता नाराजी व्यक्‍त केली. यानंतर कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असून, स्वच्छतेसाठी संकुल बंद करण्याचे आदेश काढले. 

गोलाणी मार्केटमधील कचऱ्यासंदर्भात शहरातील एका नागरिकाने दिलेल्या तक्रारीवरून प्रांताधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीत मार्केट परिसरात प्रचंड अस्वच्छता दिसून आल्याने भारतीय दंडसंहिता कलम 133 प्रमाणे असलेल्या अधिकारानुसार त्यांनी स्वच्छतेसाठी संपूर्ण संकुलच बंद करण्याचे आदेश प्रभारी आयुक्तांना दिले. स्वच्छतेसाठी संपूर्ण संकुलातील दुकाने बंद करण्याची राज्यातील ही पहिलीच कारवाई असून, आज (ता.16) सकाळपासून मार्केट परिसरात पोलिस बंदोबस्त लावत दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. जोपर्यंत मार्केट स्वच्छ होत नाही, तोपर्यंत दुकाने बंदच ठेवण्याचे आदेश आहे. दुकाने बंद असल्याने सकाळीच सर्व व्यापाऱ्यांनी मार्केटमध्ये गर्दी केली होती. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा : 

Web Title: jalgaon news clean campaign dirty golani market