स्पर्धा परीक्षेच्या नावे चोऱ्यांचा प्रताप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

जळगाव - वृद्धेला मारहाण करून तिच्या अंगावरील दागिने लुटून नेल्याची घटना शनिवारी घडली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली असून, अटकेतील तरुण मूळ यावल येथील रहिवासी आहेत. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जळगावमध्ये ते रूम करून राहत होते. पोलिसांनी त्यांच्या रूमची झडती घेतली असता टॉमी आढळून आली. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील पोलिसाच्या घरात भाड्याने राहणारा (मूळ रा. यावल) विद्यार्थी हर्षल कुळकर्णी आणि त्याचा इस्टेट ब्रोकर मित्र भरत खंडेलवाल या दोघांना जिल्हा पेठ पोलिसांनी ऐक्‍क्‍यांशी वर्षीय वृद्धा प्रमिला महाजन या आजीबाईला बेदम मारहाण करून लूटमार केल्या प्रकरणी अटक केली आहे. अटकेतील दोघांना आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. सरकारपक्षातर्फे ॲड. अनिल गायकवाड यांनी कामकाज पाहिले.

स्पर्धा परीक्षेचे अभ्यासक? 
मूळ यावल तालुक्‍यातील हर्षल कुळकर्णी या तरुणाचे पदवीपर्यंत शिक्षण झालेले आहे. कुटुंबाकडे पंधरा एकर बागायती शेती असून कुटुंबीयांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाकरिता जळगावी राहण्यासाठी त्याने तयार केले. गणेश कॉलनीत भाड्याने खोली घेऊन वास्तव्यास होता. त्याचा मित्र भरत खंडेलवाल हा पहिलवानी करतो, व्यायामशाळेत मार्गदर्शक म्हणून कामाला असून त्याचे वडील खासगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.  

पुस्तकांऐवजी रूमवर ‘टाॅमी’
न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगी केल्यावर पोलिसांनी हर्षल कुळकर्णी वास्तव्याला असलेल्या रूमची झडती घेतली. पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, भास्कर पाटील, नाना तायडे, अजित पाटील यांच्या पथकाने रूमची झडती घेतल्यावर स्पर्धा परीक्षांचे एकही पुस्तक या खोलीत आढळून आले नाही. उलट घरफोड्या करण्यासाठी आवश्‍यक असलेले हत्यार लोखंडी टॉमी सापडली आहे. 

Web Title: jalgaon news competition exam thief crime cheating