न्यायालयाने फेटाळला पोलिस मगरेचा जामीन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

जळगाव - म्हसावद (ता. जळगाव) येथील पोलिस दूरक्षेत्रात ड्यूटीला असलेला पोलिस कर्मचारी सुशील अशोक मगरे याने गुन्हेगारी टोळी तयार करून नेरी- औरंगाबाद रस्त्यावरील माळप्रिंपीनजीक उभ्या असलेल्या ट्रकच्या चालकाला बंदुकीचा धाक दाखवून लूट केली होती. जामनेर पोलिसांनी त्याला 19 सप्टेंबरला अटक केली होती. संशयित मगरे यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला होता. त्यावर कामकाज होऊन न्यायालयाने जामीन फेटाळून लावला आहे. 

माळपिंप्री गावाजवळ 12 सप्टेंबरला रात्री ट्रकचालक दत्तात्रय फुलारे (रा. कोपरगाव) हे ट्रकजवळच उभे होते. त्यांना बंदुकीचा धाक दाखवून तीन अज्ञातांनी त्यांच्याजवळील चार हजार रुपये लुटण्याची घटना घडली होती. या प्रकरणी चौकशी करून 19 सप्टेंबरला संशयित पोलिस सुशील मगरे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अटक झाल्यानंतर त्याच्या गुन्हेगार साथीदारांसोबत त्याने केलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची जंत्रीच पोलिसांनी गोळा केली. तेव्हा पासून मगरे कारागृहात असून त्याच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला होता. न्या. ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात जामिनावर कामकाज होऊन संशयित टोळीविरुद्ध असलेले भक्कम पुरावे, आणि प्रथमदर्शनी संशयिताचा त्यात सहभाग असल्याचे आढळून येत असल्याने न्या. ज्योती दरेकर यांच्या न्यायालयाने संशयित मगरे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सरकारपक्षातर्फे ऍड. पंढरीनाथ चौधरी यांनी कामकाज पाहिले. 

Web Title: jalgaon news court police Sushil magare