ढाबाचालकाने निम्म्या किमतीत घेतले बिम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

जळगाव - छत्तीसगड येथून जुनागड गुजरात येथे लोखंडी बिम घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे अपहरण करून माल लंपास करण्यात आला होता. औद्योगिक वसाहत पोलिसांनी या गुन्ह्यात अगोदर चार संशयितांना अटक केली होती. या प्रकरणी दरोडेखोरांकडून लुटलेल्या मालास निम्म्या किमतीत घेणाऱ्या ढाबाचालकासह या कटातील मुख्य संशयित कारमालकास अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितांना पोलिस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले आहे. 

रायगड जिंदल (छत्तीसगड) येथून प्रत्येकी साठ हजार रुपये किमतीचे ३९ अवजड लोखंडी बिम घेऊन ट्रक घेऊन निघालेला चालक संदीप भजनलाल पाल ऊर्फ जलेदारकुमार (वय-२७) हा ४ मार्चला जामनगरकडे (गुजरात) निघाला होता. खामगाव (बुलडाणा) मार्गाने जाताना नांदुऱ्याजवळ सिल्व्हर रंगाची इनोव्हा कारमधील (एमएच २२ डी ७००) दरोडेखोरांनी पाठलाग करीत ट्रॉला अडवला. चालकास रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत त्याच्या ताब्यातील २३ लाख ४० हजार रुपये किमतीचे लोखंडी बिम घेऊन जाणारा ट्रक लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आठ संशयितांपैकी शेख हसन शेख सलीम, शेख फारुख शेख जमाल, शाबीर शाह अमान शाह व आरिफ शाह सुभान शाह या चौघांना अटक केली होती.  त्यांच्याकडून चोरी केलेल्या माल जप्त करण्यात आला असून पळून गेलेल्या साथीदारांमधील शेख अमिर शेख गुलाब (वय-३२  रा. मिर्झानगर, बुलडाणा) व शेख लतीफ शेख भिकन (वय-३४  रा हिंगणाकाझी, बुलडाणा) या दोन संशयितांना अटक करून आज न्यायालयात हजर केले असता दोघांना न्या. व्ही. एच.खेडकर यांच्या न्यायालयाने १४ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ढाबाचालकाने घेतला दरोड्याचा माल 
पोलिसांनी अटक केलेल्या मुक्ताईनगर तालुक्‍यातील ढाबाचालक लतीफ शेख भिकन याने दरोड्यातील लोखंडी बिमचा साडेआठ टनचा माल निम्मेपेक्षा कमी दराने अर्थात २२ रुपये किलोने घेतला होता. हा माल पोलिसांनी जप्त केला आहे. गुन्ह्यातील महत्त्वाचा संशयित शेख अमीर शेख गुलाब हा गुन्ह्याच्या कटात सहभागी असून गुन्ह्यात वापरलेली इव्होवा कार त्याच्या मालकीची आहे. मुख्य सूत्रधार पंजाबी गुन्हेगार पलविंदरसिंग व शेरूसिंग (रा. दोघे पंजाब) हे अद्याप फरार आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: jalgaon news crime