गणेश कॉलनीतून चोरलेल्या कारने तेलंगणात गुन्हे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

जळगाव - जिल्ह्यासह औरंगाबाद, नाशिक येथून महागड्या कार चोरून त्याद्वारे घरफोड्या दराडे टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीने अनेक गुन्ह्यात जळगावच्या वाहनांचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. तेलंगणा पोलिस मागावर असलेल्या या टोळीने वाहन सोडून पळ काढला असून ही कार पोलिसांनी जप्त केली आहे. इतरही जिल्ह्यातील वाहने या टोळीने लांबवले असून तेलंगणा आणि महाराष्ट्राचे जळगाव पोलिस या टोळीचा पिच्छा पुरवत आहेत. 

गणेश कॉलनीत गीतेश मधुकर मेश्राम यांच्या दरवाज्याचे कुलूप तोडून कार (क्रमांक एमएच 43 बीएफ 8310) चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान तेलंगणा पोलिस पथक एका दरोडेखोरांच्या टोळीच्या मागावर असताना पाठलाग करीत असलेली कार संशयितांना देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) येथे सोडून पळ काढला आहे. कारची माहिती घेतली असता हे वाहन जळगाव शहरातील मेश्राम यांच्या मालकीची असून नंबरप्लेट बदलून गुन्हेगार तिचा वापर करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने तेलंगणा पोलिसांनी जळगाव पोलिसांशी संपर्क साधला. प्राप्त माहिती नुसार मेश्राम यांच्या कार प्रमाणेच या भामट्यांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव सहित औरंगाबाद, पुणे जिल्ह्यातूनही वाहने लांबवून त्याच वाहनांवर अनेक मोठे गुन्हे केल्याची माहिती समोर येत आहे. मेश्राम यांची कार तपासाधिकारी संदीप अराख यांनी ताब्यात घेतली असून गुन्हेशाखेच्या तांत्रिक तज्ज्ञांमार्फत गुन्हेगारांचा माग शोधण्यात येत आहे. या टोळीने शेगाव येथून मारुती सियाझ कार चोरून त्याद्वारे खामगाव येथे मोठी घरफोडी केल्याची माहिती समोर आली आहे. 

Web Title: jalgaon news crime