ममुराबाद नाला फाइल गहाळ प्रकरणी अभियंत्यासह तिघांना नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

जळगाव -  ममुराबाद रस्त्याच्या कडेला असलेल्या लेंडी नाल्याचा मूळ प्रवाह बदलल्याच्या तक्रारीनंतर या नाल्याशी संबंधित नकाशाची फाइलच महापालिकेतून गहाळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणाची दखल घेत नगररचनाकार बागूल यांनी नगररचना विभागातील संबंधित अभियंता, शिपाई, रेकॉर्ड किपर यांना तीन दिवसांत फाइल शोधण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील श्री श्री इन्फ्रास्ट्रक्‍चर व विजयकुमार जैन व्हेंचर ग्रुप यांनी बांधकाम करण्यासाठी ममुराबाद रस्त्याच्या कडेला वाहणाऱ्या लेंडी नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलल्याची तक्रार आयुक्त जीवन सोनवणे यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यावरून तक्रारदार, आयुक्त, नगररचना विभागाचे अधिकारी व अभियंत्यांनी नाल्याची पाहणी केली होती. गावनकाशावरून लेंडीनाला योग्य असल्याचा अहवाल आयुक्तांना दिला होता; परंतु नाल्यावर स्लॅब टाकता येत नसल्याने आयुक्तांनी विकासकाला बाजू मांडण्याची संधी दिली होती. विकासकाने महापालिकेकडे काही कागदपत्रांची मागणी केल्यावर कागदपत्रांचा शोध घेताना नकाशा फाइल नगररचना विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला. याबाबत आज नगररचना विभागाचे नगररचनाकार श्री. बागूल यांनी तत्काळ संबंधित अभियंता विजय मराठे, शिपाई संजीव खडके, रेकॉर्ड किपर नामदेव पोळ यांना तीन दिवसांत फाइल शोधण्याचे आदेश दिले आहे. जर फाइल शोधून नाही दिली तर कार्यालयीन कारवाई केली जाईल, अशी नोटीस बजावली आहे. 

Web Title: jalgaon news crime

टॅग्स