वर्षासाठी हद्दपार दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

जळगाव - गेंदालाल मिल भागात ओळख बदलून वास्तव्याला असलेल्या व सात महिन्यांपूर्वी हद्दपार झालेल्या दोन गुन्हेगारांना आज पहाटे अटक करण्यात आली. शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे गेंदालाल मिल भागातून अटक करून दोघांना न्यायालयात हजर केले. पिंप्राळा- हुडकोतील मूळ रहिवासी आणि दुसरा शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिलमधील रहिवासी दोघेही शहरातून वर्षासाठी हद्दपार केले असताना शहरातच वास्तव्यास होते.

जळगाव - गेंदालाल मिल भागात ओळख बदलून वास्तव्याला असलेल्या व सात महिन्यांपूर्वी हद्दपार झालेल्या दोन गुन्हेगारांना आज पहाटे अटक करण्यात आली. शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे गेंदालाल मिल भागातून अटक करून दोघांना न्यायालयात हजर केले. पिंप्राळा- हुडकोतील मूळ रहिवासी आणि दुसरा शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिलमधील रहिवासी दोघेही शहरातून वर्षासाठी हद्दपार केले असताना शहरातच वास्तव्यास होते. शहर पोलिस ठाण्याच्या ‘डीबी’ पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वासुदेव सोनवणे, विजयसिंग पाटील, सुनील पाटील, दुष्यंत खैरनार, अमोल विसपुते, संजय शेलार यांच्या पथकाने पहाटे साडेपाचच्या सुमारास शोध घेत कैलास चंदू साबळे (वय २२, रा. पिंप्राळा- हुडको), शेख हारून शेख इब्राहिम (२५, रा. गेंदालाल मिल) यांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर दोघांवर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरून जानेवारी २०१७ पासून वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून दोघांना रीतसर अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांची कारागृहात रवानगी केली आहे.

Web Title: jalgaon news crime