ममुराबादच्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

जळगाव - तालुक्‍यातील ममुराबाद येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना काल घडली. 

पूजा भगवान लोहार (वय २१) या विवाहितेला छातीत दुखू लागल्याने उपचारार्थ जळगावात हलविण्यात आले. मात्र, रस्त्यातच पूजा यांचा मृत्यू झाला. दरम्यान, विवाहितेच्या कानात रक्त दिसल्याने माहेरच्या लोकांनी घातपाताचा संशय व्यक्त करीत सासरच्या मंडळींना मृत्यूस जबाबदार धरले. नातेवाइकांच्या आरोपांवरून पोलिसांनी पतीसह चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जिल्हा रुग्णालयात नातलगांमध्ये तणाव वाढल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धुळ्यात शवविच्छेदन करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे बराच वेळ शवविच्छेदन होऊ शकले नाही. 

ममुराबाद येथील विवाहिता पूजा भगवान लोहार (वय-२१) यांची प्रकृती शनिवारी (ता. २९) रात्री दीडच्या सुमारास छातीत दुखू लागल्याने अत्यवस्थ झाली. उपचारासाठी जळगावात हलविण्यात आले. मात्र, रस्त्यातच पूजा यांचा मृत्यू झाला. नंतर खासगी डॉक्‍टरकडून तिची तपासणी करून मृतदेह ममुराबाद येथे आणला व पहाटे तीनच्या सुमारास विवाहितेच्या माहेरी सिन्नर (नाशिक) येथे घटनेबाबत कळविण्यात आले. माहिती मिळताच विवाहितेचे वडील, आई यांच्यासह अन्य नातेवाईक  काल दुपारी ममुराबाद येथे दाखल झाले. मृत मुलीला पाहून आईवडिलांनी आक्रोश केला. दरम्यान, पूजा यांच्या कानातून रक्त येत असल्याचे दिसल्याने नातेवाइकांना शंका आली. मृत विवाहितेचे वडील जगदीश सुखदेव पोपटघर यांनी याबाबत तालुका पोलिस ठाण्याला दिली. नंतर 

पोलिसांनी ममुराबाद येथे जाऊन महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. विवाहितेचे शवविच्छेदन करून अहवाल आल्यावर पुढील कारवाई करू, अशी भूमिका पोलिसांनी माहेरच्या मंडळींसमोर मांडली. परंतु आरोप-प्रत्यारोपांमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन जळगावात न करता धुळे येथे करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नातेवाइकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. बराच वेळेनंतर जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेतन करण्यात आले.

Web Title: jalgaon news crime