भोणे येथील तरुणीवर अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

जळगाव - भोणे (ता. धरणगाव) येथील सतरा वर्षीय तरुणी मामाच्या गावी आली असताना, तरुणाने तिचे अपहरण करून अत्याचार केल्याची घटना घडली. औद्योगीक वसाहत पोलिसांत या प्रकरणी रात्री उशिरा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

भोणे येथील संशयित राकेश हरलाल पारधी याने सतरावर्षीय मुलीला म्हसावद (ता. जळगाव) येथून लग्नाचे आमिष दाखवून नेत नाशिक येथे अत्याचार केल्याची घटना 15 ऑक्‍टोबरला घडली. पिडीताने दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, पीडिता धरणगाव तालुक्‍यातील म्हसावद गावी मामाकडे आली असताना महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या राकेश पारधी याने तिला फोन करून गावाचा पत्ता विचारला. म्हसावद येथे येऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून नाशिक येथे मित्राच्या खोलीवर नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी औद्योगीक वसाहत पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान पाटील करीत आहे.

Web Title: jalgaon news crime