अट्टल घरफोड्या गुन्हे शाखेच्या जाळ्यात 

अट्टल घरफोड्या गुन्हे शाखेच्या जाळ्यात 

जळगाव - चोपडा शहरासह जळगाव शहरातील घरांच्या खिडक्‍या उघडून चोरी करणाऱ्या अट्टल घरफोड्या अनेक दिवसांच्या प्रयत्नाअंती गुन्हे शाखेच्या तावडीत सापडला आहे. ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडून १२ हजार रुपयांची रोकडही मिळून आली आहे. नुकत्याच केलेल्या गुन्ह्यातील हा ऐवज असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवाना केले आहे.

शहरातील शाहूनगर जिल्हा बॅंक कॉलनीतील रहिवासी माजी नगरसेवकाच्या घरासह पिंप्राळा रोड, आणि जळकी मिल अशा तीन ते चार ठिकाणी शेख शकील शेख इब्राहिम यांच्यासह शेजारी राहणारे शेख नाजीम शेख सुपडू, अयान शेख मुस्ताक व सलीम खान मुसाखान यांच्यासह एकूण आठ वेगवेगळ्या ठिकाणी २६ जूनच्या मध्यरात्री चोरट्याने खिडकीतून मोबाईल, पर्स, पॅंटच्या खिशातील रक्कम असा ऐवज चोरून नेला होता. शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी २७ जूनला गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्ह्यात शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा संशयितांच्या शोधात होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक निरीक्षक सागर शिंपी, मनोहर देशमुख, उत्तमसिग पाटील, रवींद्र गायकवाड, विजय पाटील, योगेश पाटील, मनोज दुसाने, नरेंद्र वारुळे, रमेश चौधरी, महेंद्र पाटील, बापू पाटील, प्रवीण हिवराळे, सुशील पाटील, मिलिंद सोनवणे आदींच्या पथकाने पेरलेल्या खबऱ्याने सुनील अमरसिंग बारेला (वय २०, रा. गौऱ्यापाडा ता. चोपडा) याची माहिती दिल्यावरून त्यास ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यावर पोलिसी पद्धतीने पाहुणचार झाल्यावर सुनील बारेला याने चोपडा, भुसावळ, आणि जळगाव शहरातील चोऱ्यांची कबुली दिली आहे. सुनील यास न्यायालयात हजर केले असता २६पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याकडून चोपडा तालुक्‍यासह सातपुडा पर्वतातून त्याचे भाऊबंद आणि समुदायातील इतरही तरुण साथीदारांची नावे त्याने पोलिसांना सांगितली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com