सिलेंडरच्या ट्रकवर चढून मद्यपी चालकाची स्फोटाची धमकी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

मोठा अनर्थ टळला
मिनी ट्रकला धडक दिल्याने आपला पाठलाग होणारच याची खात्री असल्याने संतोष केकांत याने भरधाव वेगात ट्रक पळवला तर रस्त्यातील वाहनांना आव्हरटेक करतांना काहींना कट मारला. किरकोळ कट लागून एकदोन दुचाकीस्वारांनाही त्याने पाडले. त्यातूनच महामार्गावरुन ट्रक उलटून भरलेले सिलेंडरसह मोठा अपघात होण्याची शक्‍यता होती.

जळगाव - इण्डेंन गॅस कंपनीच्या सिलेंडर वाहतुक करणाऱ्या ट्रकवरील मद्यपी चालकाने आकाश वाणी चौकात मिनीट्रकला धडक दिली. अपघात घडल्यावर तेथे न थांबता, भरधाव वेगात ट्रक घेवून पसार होण्याचा प्रयत्नात असतांना या ट्रकचा सतत पिच्छा पुरवून दुचाकीस्वारांनी त्याला अंजिठा चौकात ट्रक अडवला. जमाव एकवटून आता पब्लीक मार खावा लागेल या भितीने दारुच्या नशेत तर्रर्र चालक आगपेटी हातात घेवून ट्रकवर चढला आणि सिलेंटरांचा स्फोट करून सर्व उडवून देईल अशी धमकी देत गोंधळ घातल्याने अनेकाच्या काळजाचा ठोका चुकला.

हे थरार नाट्य शनिवारी 1.15 वाजेच्या सुमारास वाहन धारकांनी अजिठा चौकात अनुभवले. दरम्यान, मद्यपी ट्रक चालकाला नागरिकांनी पकडून त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्यांच्याविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शनिवार(ता.8) सकाळी मनमाड येथून इण्डेंन गॅसचा मालवाहू ट्रक (कं. एमएच.04.बीयु.9379) मध्ये दिडशे ते दोनशे स्वयंपाक गॅस सिलेंडर घेवून मद्यपी चालक संतोष बाबुराव केकांत हा जळगावी आला होता. कालींकामाता चौफुलीजवळ हे सर्व सिलेंडर तो उरवणार होता, तत्पुर्वीच, जळगावात ट्रक दाखल झाल्यानंतर दुपारी 1 वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात लाल सिग्नल सुरू असल्यामुळे संतोष केकांत याने ट्रक थांबवला. सिग्नल सुटताच चालकाने गेअर बदलतांना चुकून रिव्हर्स गेर टाकल्याने ट्रक पूढे न जाता भरधाव वेगात मागे आला आणि त्यात मागे उभा अनिकेत ट्रान्सफोर्टचा मिनी ट्रक (कं.एमएच.12.एलटी.6099) ला जोरदार धडक दिली. यात मिनट्रकचे नुकसान झाले. त्यावरील चालक अक्तर शेख यांनी संतोष केकांत याला ट्रक थांबवुन खाली उतर असे,सांगितले. मात्र, त्याने ट्रक न थांबवता भरधाव वेगात निघून गेला, अक्तर शेखने नुकसान झाल्याने, मोबाईलवर ऑटोनगरात फोन केल्यावर दोन दुचाकीस्वार काही वेळातच पोचले त्यांनी या ट्रकचा पाठलाग करुन अजिंठा चौकात ट्रक अडवला. 

मोठा अनर्थ टळला
मिनी ट्रकला धडक दिल्याने आपला पाठलाग होणारच याची खात्री असल्याने संतोष केकांत याने भरधाव वेगात ट्रक पळवला तर रस्त्यातील वाहनांना आव्हरटेक करतांना काहींना कट मारला. किरकोळ कट लागून एकदोन दुचाकीस्वारांनाही त्याने पाडले. त्यातूनच महामार्गावरुन ट्रक उलटून भरलेले सिलेंडरसह मोठा अपघात होण्याची शक्‍यता होती. मात्र, अल्लाउद्दीन यांनी पाठलाग करीत अखेर त्यांनी अंजिठा चौफुलीजवळ ट्रकच्या पूढे दुचाकी थांबवून ट्रक अडवला आणि धडक देवून पळून जाण्याबाबत जाब विचारला.

सिलेंडर स्फोटाची धमकी 
आपल्याला आता मार खावाच लागेल याची खात्री झाल्याने मद्यपीचालक संतोष केकांत याने चक्क ट्रकमधील आगपेटी हातात घेवून ट्रकवर चढला....त्यानंतर आगपेटीतील काडी जाळून सिलेंडरांचा स्फोट करून सगळच उडवितो आणि स्वत:ला संपविण्याची धमकी देत गोंधळ घातला. त्यानंतर अल्लाउद्दीन व मिनी ट्रकचालक अक्तर शेख तसेच नागरिकांनी चालकाची समजूत घालून खाली उतरविले व त्यानंतर त्याला रिक्षात बसवून औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांना घटना सांगत मद्यपी चालक संतोष केकांत यांला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याविरूध्द औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
आजीबाईंना भेटला जिल्ह्याधिकाऱ्यांच्या रूपात श्रावण बाळ !​
भारतातील चिनी नागरिकांना चीनकडून "सावधगिरीचा इशारा'
येरवडा कारागृहात कैद्यानेच केला कैद्याचा खून​
नितेश राणेंचे आंदोलन म्हणजे केवळ फालतूपणा: विनायक राऊत​
सावंतवाडीत सापडली लाल भडक नानेटी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली पाच फूटांची मगर
कोणी न्याय देता का न्याय', वृद्ध दांपत्याची आर्त हाक​
गोंदिया: गोरेगाव तालुक्‍यातील 17 गावात महिलांना मिळणार सरपंच होण्याची संधी​
तरुणाईच्या कंडिशन्स (नवा चित्रपट : कंडिशन्स अप्लाय...अटी लागू )​
नात्यांचं भावनिक हृदयांतर (नवा  चित्रपट : हृदयांतर )​
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्वाचा भारतीय महिलांचा पूर्ण निर्धार​
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांचे निधन​
शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे सहा वर्षाचा विद्यार्थी शाळेतील वर्गखोलीत तीन तास बंद​

Web Title: Jalgaon news cylinder blast warning