केंद्र, राज्य शासनाची वाटचाल हुकुमशाहीकडे: वळसे पाटील

केंद्र, राज्य शासनाची वाटचाल हुकुमशाहीकडे: वळसे पाटील
केंद्र, राज्य शासनाची वाटचाल हुकुमशाहीकडे: वळसे पाटील

जळगाव: लोकसभा, विधानसभा निवडणूकीपूर्वी केंद्र व राज्यातील भाजप प्रणित शासनाने नागरिकांना अनेक आश्‍वासने दिली होती. साडेतीन तीन वर्षानंतरही ही आश्‍वासने हा भुलभुलैय्या होता. शासनाविरूध्द मराठा समाज, नाभिक समाजासह इतर समाज आंदोलने करीत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, शेतमालाला हमीभाव नाही यामुळे शेतकरी कर्जबाजारी आहे. शासनाविरूध्द कोणी आवाज काढल्यास त्यांना विविध कारवायांना सामोरे जावे लागते. सर्वसामान्यांवर अत्याचार करणारे हे शासन आहे. यामुळे केंद्र, राज्य शासनाची वाटचाल हुकुमशाही पध्दतीने सुरू आहे, अशी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे-पाटील यांनी आज (मंगळवार) येथे केला.

या शासनाला खाली खेचण्यासाठी बारा डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसह मित्र पक्षांतर्फे नागपूरला हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करतील. या मोर्चात शेतकऱ्यांसह सर्वांनीच आपली ताकद दाखविण्यासाठी, शासनाला जाब विचारण्यासाठी एकत्र यावे आवानही श्री. वळसे पाटील यांनी केले. केंद्र व राज्य शासनाने गेल्या तीन साडेतीन वर्षापासून जनतेची दिशाभूल सूरू केली आहे. याचा निषेध करण्यासाठी आज जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा निघाला. त्यावेळी ते बोलत होते.

माजी खासदार ईश्‍वरलाल जैन, आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार अरूण पाटील, दिलीप वाघ, राजीव देशमुख, दिलीप सोनवणे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, ऍड. रविंद्र पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, तिलोत्तमा पाटील आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून हल्लाबोल मोर्चास सूरवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी बैलगाडीवर कापूस टाकून, सिलिंडर ठेवण्यात आले. कर्जमाफी झाली नसल्याने "क्‍या हूआ तेरा वादा' यासह विविध मागण्यांचे फलक घेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

आमदार, जिल्हाध्यक्ष डॉ.पाटील म्हणाले, की कपाशीला सात हजार रूपये भाव मिळण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी आघाडी शासनाच्या काळात आंदोलन केले होते. आज त्यांची सत्ता असताना ते कपाशीला भाव देत नाहीत. शेतकरी, मजूर, बेरोजगार आदींचे प्रश्‍न सोडविण्याऐवजी ते बंदूक घेवून बिबटयाला मारत आहेत. त्यांना देशाच्या सिमेवर शत्रूला मारण्यासाठी पाठविले पाहिजे. बिबट्याला मारण्याचे काम वनविभागाचे अधिकाऱ्यांचे असताना स्टंटबाजी करण्यास मंत्री महाजन रमले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेल्या मोर्चकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश देण्यात आला. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना निवेदन दिले. सर्व मोर्चेकऱ्यांना प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश मिळाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com