जळगाव जिल्ह्यातील औषधी दुकाने आज राहणार बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

जळगाव - ऑल इंडिया ऑर्गनायझेशन केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्टतर्फे आज (ता. ३०) राज्यव्यापी बंद घोषित केला आहे. हा बंद यशस्वी करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील अडीच हजार औषधी दुकानदार सहभागी होऊन औषधी दुकाने बंद ठेवणार आहे. परंतु रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन जळगाव यांच्याकडून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 

देशभरात बेकायदेशीर ऑनलाइन फार्मसी चालविल्या जात असून, केंद्र सरकारच्या स्वास्थ व कुटुंबकल्याण मंत्रालयालयातर्फे पब्लिक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या विरोधात केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट संघटनेतर्फे आज(ता. ३०) संपूर्ण देशात बंदचे आवाहन करण्यात आले आहे. बंद यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटना देखील सहभागी होत असून, यात जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट बांधवांचा सहभाग असणार आहे. संपूर्ण दिवसभर औषधे दुकाने बंद ठेवण्यात येणार असून, आपत्कालीन सुविधा संघटनेतर्फे करण्यात येणार आहे.

प्रशासनातर्फे नियंत्रण कक्ष
औषधांचा अत्यावश्‍यक वस्तू कायद्यात समावेश असल्याने उद्याच्या बंदमुळे जनतेची गैरसोय होणार नाही व रुग्णांना आवश्‍यक तेव्हा औषधे सहजरीत्या उपलब्ध होतील. रुग्णांना औषधांअभावी त्रास होणे किंवा त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, याकरिता अन्न व औषध विभागाकडून स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच औषध पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व सरकारी, निमसरकारी रुग्णालयात पुरेशा प्रमाणात औषध साठा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच खासगी रुग्णालये व वैद्यकीय व्यावसायिकांनी पुरेसा औषधसाठा त्यांच्याकडे ठेवण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. सदर नियंत्रण कक्ष हे अन्न व औषध प्रशासन (आंबेडकर मार्केट, पहिला मजला) दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२१७४७६, तसेच या कार्यालयातील औषध निरीक्षक म. बा. कवटीकवार (९०२८८६६९५९), म. नं. अय्या (८८८८८०६८२५) आणि ज. एम. चिरमेल (८७७९६५२८८०) हे नियंत्रण कक्षात उपस्थित राहतील.

Web Title: jalgaon news Drug stores medicine