शासकीय कर्मचाऱ्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

शासकीय कर्मचाऱ्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला 

जळगाव ः दिवाळीमध्ये शहरात चोरीच्या घटना दरवर्षी वाढतात असतात. त्यानुसार दिवाळी सुरू होत नाही तोच आज शहरातील द्वारकानगरातील शासकीय कर्मचाऱ्याच्या घरात चोरी झाल्याची 
घटना उघडकीस आली. रोख रक्कम, दागीने असे सुमारे दिड लाखाचे ऐवज चोरट्यांनी चोरानी चोरून नेले. 

खोटेनगराच्या पुढे महामार्गालगत असलेल्या द्वारकानगरात राहत असलेले चंद्रशेखर ठाकुर (शासकीय कर्मचारी) हे धुळ्याला कुंटूबासह आठ दिवसापासून गेले होते. चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वारासह घराचे लोखंडी गेट तोडून घरात प्रवेश करीत कापाटातील रोख पन्नास हजार व सोन्याचे दागीने चोरले. तसेच घरातील साहित्यांचे देखील नुकसान करून सामान अस्तावस्त केलेले होते. शेजारच्यांना घराचे दरवाजा उगडा दिसल्याने त्यांनी ठाकूर यांना फोनवरून माहिती दिली. मागील दिवाळीत देखील द्वारकानगरात अशा घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news dwrka nagar chori