‘खाविआ’च्या सोनवणेंची बिनविरोध निवड निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

जळगाव - येथील उपमहापौरपदासाठी खानदेश विकास आघाडीच्या गणेश सोनवणे यांनी आज अर्ज दाखल केला. अंतिम दिवस असूनही केवळ त्यांचाच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्‍चित आहे.

महापालिकेच्या बुधवारी (१३ सप्टेंबर) होणाऱ्या सभेत केवळ औपचारिक निवड होईल. आज अर्ज दाखल करतेवेळी भाजपवगळता महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. 

‘मनसे’चे ललित कोल्हे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वपक्षीय पाठिंब्यावर बिनविरोध महापौरपदी विराजमान झाले. आता रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी बुधवारी (१३ सप्टेंबर) महापालिकेची विशेष सभा होणार आहे. निवड प्रक्रियेनुसार या पदासाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार खानदेश विकास आघाडीचे गणेश सोनवणे यांनी तीन अर्ज नगरसचिव अनिल वानखेडे यांच्याकडे दाखल केले.

पहिल्या अर्जात सूचक म्हणून नितीन लढ्ढा, अनुमोदक म्हणून संदेश भोईटे, दुसऱ्या अर्जात सूचक म्हणून रमेश जैन अनुमोदक म्हणून किशोर पाटील तर तिसऱ्या अर्जात सूचक म्हणून महापौर ललित कोल्हे व अनुमोदक म्हणून राष्ट्रवादीचे गटनेते सुरेश सोनवणे उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
सोनवणे यांचा उपमहापौरपदासाठी अर्ज सादर करण्यासाठी मनसेचे महापौर ललित कोल्हे, ‘खाविआ’चे नेते रमेश जैन, स्थायी सभापती डॉ. वर्षा खडके, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी उपमहापौर सुनील महाजन, नगरसेवक कैलास सोनवणे, श्‍यामकांत सोनवणे, नगरसेवक अनंत जोशी, संतोष पाटील, ज्योती इंगळे. जनक्रांतीचे सुनील पाटील, राजेश शिरसाठ, जितेंद्र मुंदडा, प्रशांत नाईक, संदेश भोईटे, राष्ट्रवादीचे गटनेते सुरेश सोनवणे, दुर्गेश पाटील, अतुल बारी यांच्यासह भाजपवगळता सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.

Web Title: jalgaon news dy. mayor election