एकनाथ खडसेंसह सुरक्षारक्षकांना धमकी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

जळगाव -  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या दोन्ही पोलिस सुरक्षारक्षकांना मोबाईलवरून "संभलके रहो' अशा शब्दांत धमकी आली आहे. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे खडसे यांनी तीन वेगवेगळी पत्रे देऊन चौकशीची मागणी केली आहे. 

प्राप्त माहितीनुसार सोमवारी पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी 0025771043771 या क्रमांकावरून कॉल आला. त्यानंतर पहाटे सहा वाजून वीस मिनिटांनी त्यांचे पोलिस सुरक्षारक्षक गणेश पाटील यांच्या मोबाईलवर 0025771051803 या क्रमांकावरून कॉल आला व सकाळी दहाला दुसरे सुरक्षारक्षक तुषार मिस्तरी यांच्या मोबाईलवर 0025771056760 या क्रमांकावरून कॉल आला. या तीनही कॉलवर समोरून महिलेच्या आवाजात "संभलके रहो', हेच दोन वेळा सांगण्यात आले. खडसे यांनी तीनही कॉल संदर्भात लेखी तक्रार अर्ज देऊन चौकशीची मागणी केली आहे.

Web Title: jalgaon news eknath khadse