देवळी येथे शेतकऱ्यांच्या मोर्च्याने दीड तास रोखली वाहतूक

अर्जुन परदेशी
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आर. के. पाटील यांनी हे आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून वाहतूक रोखून धरली. यावेळी दोनशे शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. शेतकऱयांची सरसकट कर्जमाफी मिळावी आमचा सातबारा कोरा करावा.

चाळीसगाव : आमच्या गायीच्या दुधापेक्षा रामदेवबाबा विकत असलेल्या गायीच्या मूत्राला अधिक भाव मिळतो आहे. शेतकरी बांधवांनो ही आपली थट्टा असून शासनाची मस्ती जिरवण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी पेटून उठावे. विराट कोहलीच्या धावा मोजण्यापेक्षा शेतात राबणाऱ्या आपल्या बापाच्या धापा मोजा आणि शेत मालाला हमी भाव शासनाने द्यावा यासाठी रस्त्यावर उतरावे. शेतकऱ्यांमध्ये फूट पडणाऱ्या शासनाचा धिक्कार करावा अशी हाक किसान क्रांती मोर्च्याच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करत देण्याती आली. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आर. के. पाटील यांनी हे आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून वाहतूक रोखून धरली. यावेळी दोनशे शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. शेतकऱयांची सरसकट कर्जमाफी मिळावी आमचा सातबारा कोरा करावा. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणी करावी यासाठी शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.

किसान क्रांतीचे तालुका समनव्यक विवेक रणदिवे यांनी सांगितले, देशात सर्व विमे काढण्यासाठी एजंट घरी येतो. मात्र बळीराजाला विमा साठी रांगेत मरेपर्यंत उभे राहावे लागते ही चेष्टा आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव मिळावा. बिनव्याजी कर्ज साठ वर्षांनंतर पेंशन मिळावी. दुधाला पन्नास रुपये लिटर भाव मिळावा. अखंड व मोफत वीजपुरवठा मिळावा ठिबक व तुषारला शंभर टक्के अनुदान देण्यात यावे. या मागण्याचा पनुरुच्चर यावेळी केला. आंदोलनात या रयत सेनेचे गणेश पवार लोकसंघर्ष मोर्चाचे अतुल गायकवाड, सह्याद्री प्रतिष्टानचे दिलीप घोरपडे या संघटनांनी सहभाग घेतला. दडपिंप्री आडगाव टाकली पिलखोड शिरसगाव ब्राह्मण सेवगे देवळी या परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Jalgaon news farmer agitation in Chalisgaon