अजित पवारांच्या तोंडात भष्ट्राचाराचा बोळा कोंबल्याने ते गप्प- ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

विखे पाटलांचे भाजपशी साटेलोटे

जळगाव: शिवसेना दुतोंडी गांडूळ असल्याचे अजित पवार म्हणतात, गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे. परंतु, पवारांना किती तोंडे आहेत. उपमुख्यमंत्री असतांना ज्या तोंडाने त्यांनी शेतकऱ्यांबाबत अहवेलना करणारे शब्द उच्चारले ते तोंड आज शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आज उठविण्यास गप्प आहे. कारण त्यांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोंबला आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लगावला आहे. धरणगाव (जि. जळगाव) येथील जाहिर सभेत ते बोलत होते.

विखे पाटलांचे भाजपशी साटेलोटे

जळगाव: शिवसेना दुतोंडी गांडूळ असल्याचे अजित पवार म्हणतात, गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे. परंतु, पवारांना किती तोंडे आहेत. उपमुख्यमंत्री असतांना ज्या तोंडाने त्यांनी शेतकऱ्यांबाबत अहवेलना करणारे शब्द उच्चारले ते तोंड आज शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आज उठविण्यास गप्प आहे. कारण त्यांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोंबला आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लगावला आहे. धरणगाव (जि. जळगाव) येथील जाहिर सभेत ते बोलत होते.

उध्दव ठाकरे आज (बुधवार) जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. धरणगाव येथील सभेत बोलतांना ते म्हणाले, 'शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. आम्ही सत्त्तेत असून शेतकऱ्यासाठी आवाज उठवित असल्यामुळे अजित पवार यांनी आमची अहवेलना केली आहे. त्यांनी शिवसेना दुतोंडी गांडूळ असल्याचे म्हटले आहे, मात्र त्यांना किती तोंडे आहेत हे त्यांनीच पहावे. सत्ताधाऱ्याविरूध्द त्यांनी आवाज उठवायाला पाहिजे मात्र त्यांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोंबलेला असल्यामुळे ते गप्प आहेत.'

विखे पाटलांचे भाजपशी साटेलोटे
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, 'विरोधी पक्ष नेता असतांनाही ते सरकार आपल्याला घरच्या सारखे वाटते म्हणतात. सरकाराला आपले म्हणाणारे हे कसले आलेय विरोधी पक्षनेते. भाजप सरकारशी त्यांचे साटेलोटे आहे. शिवसेना मात्र अशा पध्दतीचे राजकारण चालू देणार नाही.'

बॅंकाना दाखविणार शिवसेना स्टाईल
राज्य सरकारने कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. मात्र, अद्यापही त्यांची अमलबंजावणी झालेली नाही. शासन कर्जमुक्तीसाठी जून 2016 पर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ देत आहे. त्यांनी वाढून 2017 करावी अशी आमची मागणी असून, शिवसेना त्यांच्या ठाम आहे. कोणत्याही परस्थिती कर्जमुक्ती झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे ईशाराही त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक बॅंकेने कर्ज दिले पाहिजे ज्या बॅंका शेतकऱ्यांना नडतील त्यांना शिवसेना स्टाईल दाखविण्यात येईल. शिवसैनिकांनी आता बॅंकेसमोर टेबल खुर्ची टाकून बसावे, असा आदेशही त्यांनी दिला आहे. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार निलम गोऱ्हे, चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, उपस्थित होते. या अगोदर पाळधी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते म्हणाले, शिवसेना कर्जमुक्ती झाल्यांशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. पाळधी गुलाबराव पाटलासारखा चांगला शिवसैनिक दिल्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: jalgaon news farmer loan uddhav thackeray political attack on ajit pawar