जळगाव जिल्ह्यात बंदमुळे बाजारातील आवक कमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

समिश्र प्रतिसाद, भडगाव, पारोळा, कजगावात बंद 
अमळनेर येथेही बंदमुळे सोमवारच्या आठवडे बाजारावर परिणाम जाणवला या ठिकाणी भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. चोपडा येथे बाजारपेठ खुल्या असल्या तरी बंदमुळे ग्राहकांचा प्रतिसाद अत्यल्प दिसून आला.

जळगाव : शेतकरी संघटनासह सर्व पक्षीयांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र बंद ला जळगाव जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळत आहे. बाजार समितीतील आवक आज कमी झाली, भडगाव, कजगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तर काही ठिकाणी संघटनातर्फे दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील भडगाव तालुक्‍यातील भडगाव, कजगावात कडकडीत बंद पाळण्यात आला.बसस्थानकासमोरील दुकाने बंद होती. अमळनेर येथेही बंदमुळे सोमवारच्या आठवडे बाजारावर परिणाम जाणवला या ठिकाणी भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. चोपडा येथे बाजारपेठ खुल्या असल्या तरी बंदमुळे ग्राहकांचा प्रतिसाद अत्यल्प दिसून आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनचे मनोहर पाटील, जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, संभाजी बिग्रेडचे वाल्मिक पाटील, जयवंत शिसोदे, किसान मोर्चाचे रतिलाल पाटील, अरूण देशमुख,विरभान पाटील आदी कार्यकर्ते बंद चे आवाहन करीत होते. मुक्ताईनगरात शिवसेनेतर्फे दुपारी रस्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे. पारोळा येथेही दुकाने बंद होती. शिवसेनेचे नेते माजी आमदार चिमणराव पाटील यांच्यासह कार्यकर्ते रस्त्यावर फिरून बंदचे अवाहन करीत होते.

Web Title: jalgaon news farmers strike agri market intake down