रिव्हॉल्वरसह गोळी बॅलेस्टिक तपासणीला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

जळगाव - गावठी रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटून आंबेडकरनगरातील तरुण जखमी झाली झाला होता. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करून पितळी गोळी काढण्यात आली. संशयित व जखमीच्या अंगावरील कपडे पोलिसांनी जप्त करून आज कलिना प्रयोगशाळेत रवाना करण्यात आले आहे. तर जप्त केलेल्या रिव्हॉल्वर आणि जबड्यातून काढलेली गोळी दोघेही बॅलेस्टिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. 

जुने जळगाव परिसरातील आंबेडकरनगरातील रहिवासी सागर रतन भालेराव (वय-23) गावठी पिस्तुलातील गोळी घशात गेल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून जटिल शस्त्रक्रियेनंतर त्याच्या घशात रुतलेली गोळी काढण्यात डॉक्‍टरांना यश आले. जखमी सागरने सांगितल्यानुसार विशाल राजू अहिरे याने घरी बोलावून रिव्हॉल्व्हर ताणले. रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर दाबल्याने गोळी ओठातून दात पाडून घशातून मानेत रुतली होती. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसांत प्राणघातक हल्लाप्रकरणी संशयित विशाल राजू अहिरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाधिकारी समाधान पाटील, भरत लिंगायत यांनी गुन्ह्यातील रिव्हॉल्वर यापूर्वीच जप्त केले होते, तर जखमीवर उपचार सुरू असलेल्या खासगी रुग्णालयातून सागरच्या मानेत रुतलेली गोळी काढल्यावर ती, रीतसर पंचनामा करून जप्त करण्यात आली होती. 

मागचा गोळीबारही उघड होईल..? 
वर्षभरापूर्वी आंबेडकरनगरात झालेल्या गोळीबार प्रकरणात चंद्रमणी तायडे यांच्या जबड्यात गोळी रुतली होती. त्यावेळी जबड्यातील गोळी शनिपेठ पोलिसांनी जप्त केली होती. मात्र, रिव्हॉल्वर संशयितांनी काढूनच दिले नव्हते. विशाल आणि त्याच्या साथीदारांनी याच रिव्हॉल्वरमधून गेल्यावर्षी गोळीबार केल्याचे पोलिसांना आढळून आले असून त्या गुन्ह्यातील शस्त्र काढून दिले नाही, म्हणून पुरावा नष्ट केल्याचे अतिरिक्त कलम लावण्यात आले आहे. दरम्यान, बॅलेस्टिक तज्ज्ञांचा अभिप्राय आल्यावर गेल्यावर्षीच्या गुन्ह्यातील हेच रिव्हॉल्वर आहे किंवा नाही हे स्पष्ट होईल. सागरच्या गोळीबार प्रकरणात संशयिताच्या शिक्षेसाठी ठोस पुरावेही त्यातून मिळणार असल्याचे तपासाधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: jalgaon news Firing case

टॅग्स