उंची वाढविण्याचा खेळ मुलांच्या जिव्हारी!

दीपक कच्छवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

मुलांना कालपासून दिवाळीच्या सुट्या लागल्या आहेत. शेत शिवाराकडे फिरायला  गेलेले शुभम गोपीचंद केदार (वय10), दिनेश अर्जुन केदार (11), गौतम भावराव पाटोळे( 10), राजरत्न सिध्दार्थ केदार (11), शुभम संजय केदार( 15), (एका मुलाचे नाव कळू शकले नाही) हे सर्व कळमडु (ता.चाळीसगाव) येथील रहिवासी आहेत. 

मेहुणबारे ता.चाळीसगाव : परीक्षा संपून मुलांना नुकत्याच दिवाळीच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे मुले विविध खेळ खेळण्यात मग्न आहेत. असाच एक खेळ कळमडू(ता. चाळीसगाव) येथील मुलांच्या जिव्हारी आला आहे. उंची वाढविण्यासाठी येथील मुलांनी चंद्रज्योतच्या बिया खाल्या. यात त्या सहाही मुलांना विषबाधा झाल्याची घटना काल(ता. 14) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली.

मुलांना कालपासून दिवाळीच्या सुट्या लागल्या आहेत. शेत शिवाराकडे फिरायला  गेलेले शुभम गोपीचंद केदार (वय10), दिनेश अर्जुन केदार (11), गौतम भावराव पाटोळे( 10), राजरत्न सिध्दार्थ केदार (11), शुभम संजय केदार( 15), (एका मुलाचे नाव कळू शकले नाही) हे सर्व कळमडु (ता.चाळीसगाव) येथील रहिवासी आहेत. 

यातील एका मुलाने  चंद्रज्योतच्या बिया उचलून नेल्या. पुढे गेल्यानंतर  या मुलांनी त्याच्या खिशातील बिया काढल्या व या बिया खाल्याने उंची वाढते असे सांगुन या सहाही मुलांनी या बिया खाल्या. थोड्या वेळाने ते घरी आले. त्यांना संडास व उलट्या होऊ लागल्याने घरच्यांनी तात्काळ त्या मुलांना मेहुणबारे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष सांगळे यांनी उपचार केले. मात्र, त्या मुलांची संडास व उलटी थांबत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठविण्यात आल्याचे डाॅ.सांगळे यांनी सांगितले.

Web Title: jalgaon news food poisoning in chalisgaon