फुले, सेंट्रल मार्केटमधील अनधिकृत गाळ्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

फुले, सेंट्रल मार्केटमधील अनधिकृत गाळ्यांवर कारवाई 

जळगाव  : शहरातील महात्मा ज्योतिराव फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील 8 अनधिकृत गाळ्यांवर 
आज पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. दुकानातील मालासकट गाळे पंचनामा करून सिल करण्यात आले. तसेच मार्केटमधील बंद शौचालयातील ठेवलेले सामान जप्त करून ते खुले करण्यात आले. 
तर फुले मार्केटमधील कबुतर खाना दुकानांच्या लाईनमध्ये मरच्या मजल्यावरील दुकानांबाहेरील जागेत औषधी विक्रेत्याने अनधिकृत बांधकाम करून त्याचा वापर करत असल्याचे अढळून आले. 

महापालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्या आदेशाना आज उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा ज्योतिराव फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्यात आली. फुले मार्केट मधील काही व्यापाऱ्यांनी मिटर रुम, जिन्या खालील जागेत पक्के बांधकाम करुन अनधिकृतपणे गाळे तयार केले असून त्यांचा व्यवसायीक वापर केला जात असल्याचे अढळून आले होते. त्यानुसार आज सकाळी अकरा वाजता ही कारवाई सुरू करू करण्यात आले. यावेळी अतिक्रमण निर्मूलन विभाग अधिक्षक एच. एम. खान, किरकोळ वसुली विभाग प्रमुख नरेंद्र चौधरी यांच्यासह संजय ठाकुर आदी दोन्ही विभागाचे 25 कर्मचारी तर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news gale sil